सम्यक बहुउद्देशिय प्रतिष्ठान तर्फे संविधान प्रास्ताविकेचे वाचन
सुर्यनगरी, बारामती( वार्ताहर क्रांतिवीर रत्नदीप) : २६ नोंव्हेबर भारतीय संविधान दिनानिमित्त सम्यक बहुउद्देशिय प्रतिष्ठान ,सुर्यनगरी,एम आय डी सी चौक बारामती यांच्या वतीने ग्रामिण पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक मोरे साहेब तसेच API अश्विनी शेंडगे मॅडम यांच्याकडून संविधान ऊद्देशिका वाचन झाले .
त्यावेळी सम्यक बहुउद्देशिय प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद कांबळे सर,प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र कांबळे प्रतिष्टाणचे सचिव किरण मोहिते प्रतिष्ठानचे खजिनदार चंद्रकांत वाघमारे,तसेच प्रतिष्ठानचे सभासद सोमनाथ कांबळे,सतिश थोरात,प्रशांत सावंत,राजेंद्र राजगुरु,सिताराम घोगरे,प्रविण कनवाळु,राजेश कटाणे,संतोष मोरे,महेंद्र माने,बाळासाहेब रणवरे, या सर्वांच्या उपस्थितत संविधान दिनाच्या हार्दिक शूभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला.


