Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नगर परिषद बुटीबोरी द्वारे घराचे मालकी पट्टे देण्याबाबत ठराव केल्याने हनुमान नगर वासियांना दिलासा – आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच

---Advertisement---

---Advertisement---

बुट्टीबोरी : आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने गेले काही महिने पाठपुरावा केल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून बुट्टी बोरी येथील हनुमान नगर मध्ये राहत असलेल्या रहिवाशांना मालकी पट्टे देण्याचा ठराव नगरपरिषदेने केला. काल दिनांक 16 डिसेंबर 2021 ला नगराध्यक्ष राजेश गौतम यांनी हनुमान नगर येथे भेट देऊन मंचाचे नेते कैलास मडावी, विजय वरखडे, राजू पिल्लेवार, सुनील घागरे, विजेता उईके, जास्वंदा चव्हाण यांना ठरावाची प्रत दिली. कार्यकर्त्यांनी याप्रसंगी नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले.

सदर वस्तीही 1995 च्या आधीपासून बसली असून आजपर्यंत प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नव्हती. भर कोरोना काळात जागतिक आदिवासी अधिकार दिनाच्या निमित्ताने 9 ऑगस्ट 2020 व 2021 अशा सलग दोन वर्षे नगर परिषदेसमोर आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने मुख्य प्रदर्शन केले. तोंडी स्वरूपात मुख्याधिकार्‍यांनी कडे ही मागणी सांगण्यात आली. परंतु तरीही नगरपरिषदेने दखल न घेतल्याने 17 सप्टेंबर 2021 ला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2021 ला नगरपरिषदेच्या सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला. 

ठरावाची प्रत मिळावी म्हणून 14 डिसेंबर 2021 ला हनुमान नगर यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे जिल्हा संयोजक अमोल धुर्वे, अशोक आत्राम, गोपी दास उईके, कैलास मडावी, विजय वरखडे या कार्यकर्त्यांनी संबोधित करून मोर्चा काढण्याचे ठरले होते. परंतु त्यापूर्वीच ठरावाची प्रत मिळाल्याने हनुमान नगर वासी यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

आता बुटीबोरी नगरपरिषदेने जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत पाठपुरावा करावा अशी विनंती करत नागरिकांनी नगराध्यक्षांचे आभार व्यक्त केले आहे.

दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी हनुमान नगर भागात नागरिकांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करताना अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव कॉम्रेड अरुण लाटकर यांनी हनुमान नगर वासियांना पट्टे देण्याचा ठराव म्हणजे आपला एका टप्प्यावरचा विजय असल्याचे सांगितले. परंतु या ठरावाचे जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा करण्याचे कार्य येत्या काळात आपल्याला करावे लागेल. त्यांनी पट्ट्याचे काम पूर्ण होईपर्यंत संघर्ष चालूच ठेवण्याचे आवाहन जनतेला केले.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles