जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यावेळी आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश दिले आहेत, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असा शब्द आम्ही दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकांना आणखी तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही. त्यामुळे आम्ही बोललो आहे, यात कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून ते स्वबळाचा नारा देत आहेत. या आगोदरही पटोलेंच्या स्वबळाच्या विधानावरून महाविकास आघाडीत नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र आता पुन्हा नाना पटोले यांनी आपण शब्द मागे घेणार नसल्याचा निर्धार केला आहे.