Sunday, December 8, 2024
Homeआंतरराष्ट्रीयकांगोत ज्वालामुखी, हजारो लोकांचे रवांडात पलायन

कांगोत ज्वालामुखी, हजारो लोकांचे रवांडात पलायन

कांगो प्रजासत्ताकमध्ये ज्वालामुखीचा विस्फोट होऊन लाव्हारस बाहेर आल्याची घटना घडली आहे. विस्फोट होऊन सर्वत्र पसरलेला लाव्हा गोमा शहराजवळ येऊन थांबला आहे. लाव्हारसाची धग लागून गोमा शहराच्या उत्तर भागात अनेक घरांचं नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

कांगो आणि रवांडा या देशाच्या सीमेवर वसलेल्या गोमा शहरात सुमारे 20 लाख नागरिक राहतात. गोमा शहराच्या उत्तरेला 10 किलोमीटरवर माऊंट निरागोंगो हा जिवंत ज्वालामुखी आहे. शनिवारी (22 मे) निरागोंगो ज्वालामुखीचा विस्फोट झाला. या विस्फोटानंतर ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस आजूबाजूच्या परिसरात पसरू लागला आहे.

शनिवारी निरांगोगो ज्वालामुखीने रौद्र रूप धारण केले, हे निदर्शनास येताच परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोक आपापलं सामान आणि अंथरूण-पांघरूण यांसारख्या वस्तू घेऊन या परिसरातून पळ काढू लागले.

पसरणाऱ्या लाव्हारसापासून स्वतःला वाचवण्यासाठी लोक बाजूच्या रवांडा देशाकडे पलायन करू लागले. त्याचप्रमाणे अनेक जण शहराच्या पश्चिमेकडे असलेल्या इतर शहरांकडे जाऊ लागले.

ज्वालामुखीच्या विस्फोटानंतर सीमा पार करून सुमारे 3 हजार नागरिक रवांडाच्या हद्दीत आले आहेत. या स्थलांतरितांची सोय आजूबाजूच्या शाळा आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात करण्यात येत आहे, अशी माहिती रवांडाच्या प्रशासनाने दिली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय