Monday, July 15, 2024
Homeजिल्हामार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे - पालघर जिल्हा अधिवेशनास सुरूवात

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे – पालघर जिल्हा अधिवेशनास सुरूवात

तलासरी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २३ व्या ठाणे-पालघर जिल्हा अधिवेशनाची सुरुवात कॉ. गोदावरी शामराव परुळेकर भवन, तलासरी येथे झाली. या अधिवेशनाला १० तालुक्यांतून २५७ प्रतिनिधी हजर आहेत. महाराष्ट्रात यंदाच्या जिल्हा अधिवेशनांच्या मालिकेतील हे अखेरचे अधिवेशन आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ९४ वर्षे वयाचे ज्येष्ठ नेते एल. बी. धनगर यांनी ध्वजारोहण केले. तर ८४ वर्षे वयाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम यांनी हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली. 

रशिया आणि युक्रेन युध्द : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली भूमिका जाहीर

जगभरातील देशांकडून रशियाची कोंडी, लावले “हे” निर्बंध

रामू पागी, रडका कलांगडा, सुनीता शिंगडा, ताई बेंदर, चंदू धांगडा व भरत वळंबा यांचे अध्यक्षमंडळ व मिनिट्स, क्रेडेन्शियल व ठराव समित्यांची निवड केली, तर शोक ठराव भरत वळंबा यांनी मांडला.

‘कच्चा बदाम’ गाणे गाऊन रातोरात प्रसिध्द झालेले भुबन बड्याकर यांचा अपघात

अधिवेशनाचे उदघाटन माकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य डॉ. उदय नारकर यांनी केले. सद्य राजकीय आव्हानांचे विश्लेषण त्यांनी केले. तर माकप राज्य सचिवमंडळ सदस्य डॉ. अजित नवले यांनी देशातील व राज्यातील अभूतपूर्व शेतकरी आंदोलनाचे विश्लेषण करून पुढील कार्याची दिशा मांडली. तसेच केंद्रीय कमिटी सदस्य मरियम ढवळे संबोधित केले. तर जिल्हा अधिवेशनाचा समारोप उद्या केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे करणार आहेत.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) मध्ये विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय