Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !

Blinkit CEO Albinder Dhindsa : नववर्षाच्या पूर्वसंध्येला ब्लिंकिटने विक्रमी ऑर्डर नोंदवत ऑनलाईन खरेदीचा नवा उच्चांक गाठला आहे. ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंदसा (Albinder Dhindsa) यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, यंदा ग्राहकांनी वेगळ्या आणि मनोरंजक वस्तूंच्या ऑर्डर दिल्या आहेत.

---Advertisement---

धिंदसा यांनी सांगितले की, 31 डिसेंबर रोजी 1,22,356 कंडोम पॅक, 45,531 बाटल्या मिनरल वॉटर, 22,322 पार्टीस्मार्ट कॅप्सूल, 2,434 ईनो पॅकेट्स, 2,34,512 पॅकेट्स आलू भुजिया, 45,531 टॉनिक वॉटरच्या कॅन्स, 6,834 बर्फाच्या पॅकेट्स, 1,003 लिपस्टिक, आणि 762 लायटर या वस्तूंचा खप मोठ्या प्रमाणावर झाला.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ऑनलाईन खरेदीत कंडोमच्या विविध फ्लेवर्सची मागणी मोठ्या प्रमाणावर झाली. ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंदसा यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, चॉकलेट फ्लेवर सर्वाधिक पसंतीस उतरत 39.1% विक्री झाली. तर स्ट्रॉबेरी 31.0%, बबलगम 19.8%, इतर फ्लेवर्स 10.1% मागणीत राहिले.

---Advertisement---

विशेष म्हणजे यंदाच्या 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या वस्तूंपैकी पुरुषांच्या अंडरवेअरचा देखील समावेश असल्याची माहिती ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंदसा यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

ब्लिंकिटने (Blinkit) नववर्षाच्या पूर्वसंध्येला ऑर्डर्स प्रति मिनिट (ओपीएम) आणि प्रति तास (ओपीएच) या दोन्ही आकडेवारीत विक्रमी कामगिरी केली. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे ब्लिंकिटच्या इतिहासात हा दिवस सर्वाधिक गतीने ऑर्डर्स पूर्ण करण्याचा ठरला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘डॉक्टरांनी केले मृत घोषित, रूग्ण आला घरी चालत’ या अजब घटनेची जोरदार चर्चा

पुणे मेट्रो फेज 2 मध्ये सात नवीन मार्गांचा समावेश

अभिनेता दिलीप शंकर यांचे निधन, हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह

मोठी बातमी : पुजाऱ्यांना मिळणार दरमहा 18,000 सन्मान निधी

मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles