अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज (शुक्रवारी) पहाटे साडे तीन वाजता अहमदाबादमध्ये निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्या आजारी होत्या. हिराबेन यांना बुधवारी २८ डिसेंबरला अहमदाबादमधील यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करून पंतप्रधान मोदी अहमदाबादला निघाले आहेत. हावडा, कोलकाता येथे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून आणि रेल्वेच्या इतर विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र, आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सामील होऊ शकतात,असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. हिराबेन मोदी यांच्या पार्थिवावर गांधीनगरमध्ये अंतिमसंस्कार होणार आहेत.