Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भाजप आमदार महेश लांडगे यांना मातृशोक, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून लांडगे कुटुंबियांचे सांत्वन

अंत्यविधीवेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

---Advertisement---

पिंपरी चिंचवड : भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना मातृशोक झाला आहे. हिराबाई किसनराव लांडगे (वय-६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर भोसरी गावातील वैकुंठ स्माशनभूमीमध्ये रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून हिराबाई लांडगे संधीवात आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जंतुसंसर्गामुळे प्रकृती चिंताजनक झाल्याने शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पती किसनराव लांडगे, मुलगा आमदार महेश लांडगे, सचिन लांडगे, कार्तिक लांडगे तीन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

---Advertisement---

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडगे यांच्या निवासस्थानी सायंकाळी भेट दिली. तसेच, लांडगे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राहुल कुल यांच्यासह माजी मंत्री बाळा भेगडे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली…

लांडगे कुटुंबियांची पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात नाती-गोती आहेत. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रात गोतावळा असल्यामुळे आमदार लांडगे यांच्या मातोश्रींच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसमुदाय जमला होता. यामध्ये खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार सुनील शेळके, राहुल कुल, उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शंकर जगताप, एकनाथ पवार यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, हितचिंतकांनी हिराबाई लांडगे यांना आदरांजली वाहिली.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles