Friday, March 29, 2024
Homeजिल्हाकॉमेड विलास सोनवणे यांचे निधन !

कॉमेड विलास सोनवणे यांचे निधन !

पुणे : परिवर्तनवादी चळवळीतील लढाऊ जीवनदानी कार्यकर्ता, मार्क्सवादी विचारक कॉमेड विलास सोनवणे ( वय ६८ ) यांची बुधवार, ( दि . ४ ) सकाळी प्राणज्योत मालवली. कॉम्रेड सोनवणे यांना अमरधाम स्मशानभूमी, भक्तिशक्ती चौक, निगडी, पिंपरी चिंचवड येथे रात्री उशिरा अखेरचा निरोप देण्यात आला.

कॉ. सोनवणे हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी गावचे  विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा चळवळीत सक्रिय सहभाग होता. ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक सचिव होते. पहिल्यांदा सर्व धर्मातील ओबीसींची संघटना उभी करण्याचं काम त्यांनी केले. मुस्लिम ओबीसी चळवळीचे ते संस्थापक होते. डाऊ आंदोलन, सेझ विरोधी लढा, सर्व धर्मीय – सर्व पंथीय सामाजिक परिषद याचे ते संस्थापक होते. लढता लढता केलेल्या चिंतनातील काही, बहुजन स्रीवाद, मुस्लिम प्रश्नाची गुंतागुंत ही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. विविध नियकालिकांमधून ही त्यांनी विपुल लेखन केले आहे.

त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करत डॉ. सुरेश बेरी म्हणाले, “जेष्ठ कम्युनिस्ट नेते

कॉम्रेड विलास सोनवणे यांचा भारतातील जाती व्यवस्था आणि त्यातून होणारे बहुजनांचे शोषण यावर गाढा अभ्यास होता. भारतातील वर्ण व्यवस्थेमुळे सामाजिक पिळवणूक होते, जमीनदार सरंजामदार वर्गाने येथील बहुजन समाज आर्थिक आणि जातीय व्यवस्थेमुळे पीडित आहे, निखळ वर्गीय लढा करून शोषण मुक्त समाज निर्माण करता येणार नाही, अशी त्याची वैचारिक मांडणी होती. 2006 च्या रायगड,पुणे जिल्ह्यातील SEZ विरोधी आंदोलनात त्यांनी मेधा पाटकर यांच्या बरोबर संघर्ष केला होता.”

तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतीकुमार कडुलकर म्हणाले, “सिद्धांतवादी मार्क्सवादी प्रचारक विलास सोनवणे हरपले, त्यांना माकप पिंपरी चिंचवड च्या वतीने लाल सलाम !”

■ कारकीर्द :

– १९७३ – “स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया” ( S. F. I. ) च्या माध्यमातून मार्क्सवादी – कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश, “स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ” ( S. F. I. ) च्या महाराष्ट्र शाखेचा संस्थापक सचिव.

– १९७३ – ७५ – “सिद्धार्थ कॉलेज” मुंबईच्या विद्यार्थी संघटनेचा पहिला कम्युनिस्ट विद्यार्थी सचिव

– १९७८ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामधून हकालपट्टी. 

– १९७८ – ‘कॉम्रेड शरद पाटील’ यांच्यासोबत “सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष” स्थापनेत सहभाग. 

– १९७९ – नक्षलवादी चळवळीत प्रवेश. 

-१९८१ – बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील आश्रमाने पारधी समाजाच्या बळकावलेल्या जमिनी सोडवण्यासाठी लढा. 

– महाराष्ट्रातील इतर असंख्य लढे – चळवळी आंदोलनांमध्ये सहभाग आणि नेतृत्व.

– १९९० – मुस्लीम मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत पुढाकार.

– १९९१ – वर्गेतर सामाजिक रचनांच्या मुद्द्यांवर नक्षलवादी चळवळीतून बाहेर. 

– १९९२ – अॅड.जनार्धन पाटील यांच्या सोबतीने मुस्लीम ओबीसी चळवळीची सुरुवात 

– १९९९ – देशातील मार्क्सवादी – लेनिनवादी, फुलेवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, जयप्रकाशवादी, लोहियावादी चळवळींतून थबकलेल्या कार्यकर्त्यांची संवादप्रक्रिया सुरु करण्यात पुढाकार. 

– २००१ – या संवादप्रक्रियेतून ‘युवा भारत’ या संघटनेची स्थापना. 

– २००५ – २००८ – न्या.पी.बी.सावंत व न्या.बी.जी.कोळसे पाटील, अॅड.दत्ता पाटील यांच्या सोबत रायगड येथील रिलायन्स सेझ प्रकल्प हटविण्याची यशस्वी लढा.

– २००८ – वारकऱ्यांच्या सहकार्याने ( ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वात ) पुण्याजवळील डाऊ केमिकल्स कंपनीच्या विरोधात झालेल्या यशस्वी लढ्याचे जनक. 

– २००८ – रायगडच्या सेझ विरोधी लढ्याच्या आधाराने देशभरातील सर्व सेझ विरोधी लढ्यांच्या समन्वय समितीची स्थापना. 

– २०११ – महाराष्ट्रातील समतावादी धर्म व पंथाच्या सहभागाने बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली साम्राज्यवाद विरोधी सर्वधर्मीय व सर्व पंथीय सामाजीक परिषदेची स्थापना.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय