Friday, March 29, 2024
Homeजिल्हाकॉ. गोदुताई परुळेकर वसाहत १०० टक्के बंद यशस्वी, एमआयडीसी कडकडीत बंद!

कॉ. गोदुताई परुळेकर वसाहत १०० टक्के बंद यशस्वी, एमआयडीसी कडकडीत बंद!

नरसय्या आडम (मास्तर) यांच्यासह शेकडो माकप च्या कार्यकर्त्यांना अटक 

सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणांविरुद्ध सकाळी ७ वाजल्यापासून अक्कलकोट रोड, एमआयडीसी, गांधी नगर, कमटम नगर, विणकर वसाहत, सुनील नगर, कामगार वसाहत आदी परिसरातील कारखाने कडकडीत बंद ठेवून कामगार भारत बंद, सोलापूर बंद पाळले. या बंदमध्ये २५ हजार यंत्रमाग कामगार, ६५ हजार विडी कामगार, २५ हजार असंघटीत कामगार, ५ हजार बांधकाम कामगार, अन्य छोट्यामोठ्या व्यवसायातील कामगार असे दीडलाख कामगार सहभाग नोंदवून बंद यशस्वी केला, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे.

हेही वाचा ! केळी खाण्याचे फायदे व तोटे !

तसेच तालुका दक्षिण सोलापूर कुंभारी येथील कॉ. गोदुताई परुळेकर वसाहत १०० टक्के बंद पाळले गेले. या वसाहतीतील विडी कारखाने, यंत्रमाग कारखाने, छोटेमोठे दुकानदार, रिक्षा, सिटी बस आदि व्यवस्था ठप्प करून ५० हजार कामगार बंद यशस्वी केले. या सर्व लढाऊ, कष्टकरी कामगार कर्मचारी, छोटेमोठे उद्योजक, व्यापारी, फेरीवाले, किरकोळ विक्रेते आदींनी केंद्र सरकारच्या जनताविरोधी धोरणांचा धिक्कार केले. यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने क्रांतिकारी शुभेच्छासह अभिनंदन केले. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली सिटू सलंग्न लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन, लाल बावटा विडी कामगार युनियन, लाल बावटा असंघटीत कामगार युनियन, अ.भा.जनवादी महिला संघटना, अ.भा.किसान सभा, डी.वाय.एफ.आय., एस.एफ.आय., लाल बावटा दिव्यांग संघटना, लाल बावटा बांधकाम कामगार युनियन, लाल बावटा आशा वर्कर्स युनियन आदि संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते सोमवार दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून अक्कलकोट रोड, एमआयडीसी, गांधी नगर, कमटम नगर, विणकर वसाहत, सुनील नगर, कामगार वसाहत या परिसरात लाल झेंडे हाती घेऊन प्रत्येक कारखान्यामध्ये जाऊन बंदचे आवाहन केले. 

या दरम्यान पोलिसांचे गस्त पथक व ताफा कार्यकर्त्यांचा पाठलाग करत रोखण्याचा प्रयत्न केले. कार्यकर्त्यांवर दडपशाही करत बळजबरीने झेंडे हिसकावून घेतले. कामगारांवर दबाव आणले. तरीही कार्यकर्ते पोलिसांना चकवा देत बंदमध्ये कामगारांना सामील केले. ठीक १०.१५ कॉ. नरसय्या आडम (मास्तर) हे यंत्रमागधारक संघ कार्यालय येथे दाखल झाले. 

आडम मास्तर येताच पोलिसांचा बंदोबस्त वाढला. पोलीस अधिकारी व कर्मचारी आडम मास्तर यांना घेरले व कामगारांना पांगविण्याचा प्रयत्न सुरु झाला. तत्काळ सर्व माकपचे कार्यकर्ते यंत्रमाग धारक संघ कार्यालय येथे जमा होऊन तब्बल १ तासभर कार्यकर्त्यांनी गगनभेदी आवाजात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच पोलिसांच्या दडपशाहीचाही निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे कॉ. आडम मास्तर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते चालत यंत्रमाग धारक संघ कार्यालय ते थेट पोलीस ठाणे गाठले. 

यावेळी सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, सुंनदा बल्ला, शेवंताताई देशमुख, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख (मेजर), म.हनीफ सातखेड, कुर्मय्या म्हेत्रे, सलीम मुल्ला, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, बाबू कोकणे, विल्यम ससाणे, अशोक बल्ला, अनिल वासम, मुरलीधर सुंचू, दाउद शेख, नरेश दुगाणे, जावेद सगरी, बापू साबळे, अकिल शेख, दत्ता चव्हाण, शहाबुद्दीन शेख, मुन्ना कलबुर्गी, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, श्रीनिवास गड्डम, सिद्धाराम उमराणी, वासिम मुल्ला, अप्पाशा चांगले, मधुकर चिल्लाळ, दिनेश बडगु, रफिक काझी, रवींद्र गेंटयाल, प्रवीण आडम, प्रकाश कुऱ्हाडकर, इलियास सिद्धिकी, असिफ पठाण, अंबादास बिंगी, किशोर गुंडला, शिवा श्रीराम, श्रीनिवास तंगद्गी, अभिजित निकंबे, दीपक निकंबे, आरिफ मणियार, शामसुंदर आडम, मल्लेशम कारमपुरी, नितीन गुंजे, बजरंग गायकवाड, हुसेन शेख, जुबेर सगरी, श्रीनिवास गोन्याल, बाबू म्हेत्रे, नवनीत अंकम, तिपन्ना पेद्दी, बालाजी गुंडे, बालाजी तुम्मा, नागेश जल्ला, मोहन कोक्कुल आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय