Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नागपूर हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, केली मोठी घोषणा

नागपूर : १७ मार्चच्या रात्री नागपूर शहरातील महाल आणि हंसापुरी परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर (Nagpur Riots) राज्य सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर निर्णय घेतला असून, दंगलखोरांकडूनच नुकसानभरपाई वसूल केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

---Advertisement---

मुख्यमंत्र्यांनी चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तेची जप्ती केली जाईल. नुकसान भरपाईसाठी त्यांची मालमत्ता लिलाव करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. (हेही वाचा : धक्कादायक : भाजप नेत्याने पत्नी आणि 3 मुलांवर झाडल्या गोळ्या; तिन्ही मुलांचा मृत्यू)

पूर्वनियोजित कट असल्याचा संशय | Nagpur Riots

मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत गंभीर आरोप करताना सांगितले की, ही घटना अचानक घडलेली नसून, पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. दंगलखोरांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. (हेही वाचा – सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच, अहवालात खळबळजनक खुलासे)

---Advertisement---

दंगलग्रस्तांना मदत, परंतु दंगलखोरांकडूनच वसुली

हिंसाचारामुळे ज्या नागरिकांचे घरे, दुकाने, वाहने आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना राज्य सरकारकडून मदत दिली जाईल. मात्र ही रक्कम सरकार दंगलखोरांकडूनच वसूल करणार आहे. (Nagpur Riots) (हेही वाचा : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तुमचं पाणी पितोय, तुम्हाला माहित आहे काय ?)

कठोर कायदेशीर कारवाई होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ही कारवाई केवळ नागपुरापुरती मर्यादित राहणार नसून, महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडल्यास तिथेही हेच कठोर धोरण लागू केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ आणि मीडियाकडून मिळालेल्या रेकॉर्डिंगच्या आधारे १०४ संशयितांची ओळख पटवली आहे. आतापर्यंत ९२ जणांना अटक केली असून त्यापैकी १२ आरोपी अल्पवयीन आहेत.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles