Friday, March 29, 2024
Homeकृषीहिरडा नुकसानीची भरपाई द्या - किसान सभा

हिरडा नुकसानीची भरपाई द्या – किसान सभा

आंबेगाव,(दि . २७) : निसर्ग चक्रीवादळात शेतपिकांची नुकसान भरपाई मिळालेली नाही . फळबागा घरे यांच्याबरोबर हिरडा या औषधी फळाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

तालुक्यातील पश्चिम आदिवासी  भागातील ४३ गावांतील सुमारे ३ हजार १ ९ ८ पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही . ही नुकसानभरपाई त्वरित मिळावी ; अन्यथा आंदोलन करावे लागेल , असा इशारा किसान सभेच्या वतीने आपत्ती व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे . जुन्नर , आंबेगाव , खेड तालुक्यांत मुख्य उत्पन्नाचे साधन हिरडा हे आहे . त्यामुळे नुकसान भरपाई त्वरीत मिळावी . 

यावेळी किसान सभेचे नाथा शिंगाडे , डॉ.अमोल वाघमारे , अशोक पेकारी , राजू घोडे,विश्वनाथ निगळे , लक्ष्मण जोशी , अमोद गरूड उपस्थित होते .

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय