Friday, March 29, 2024
Homeकृषीअतिवृष्टीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या - कॉ.अर्जुन आडे

अतिवृष्टीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – कॉ.अर्जुन आडे

ईस्लापुर : सततच्या प्रचंड पाऊसाने किनवट तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. गेली सात-आठ दिवसाच्या अतिवृष्टीने इस्लापुर, जलधरा, शिवणी भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तातडीने प्रशासनाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना अतिवृष्टीची योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी किसान सभेचे कार्यध्यक्ष कॉ.अर्जुन आडे यांनी केली आहे.

किनवट तालुक्यातील इस्लापुर, शिवणी, जलधरा तथा अनेक परीमंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने हजारो हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत, नदी नाल्यांना पुर आल्याने काठालगतची शेती वाहून गेली आहे, शेत जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. इस्लापुर -शिवणी, जलधरा मंडळात १०० मी.मी पेक्षा जास्त पाऊसाची नोदं झाली आहे. नदी नाले ओसांडुन वाहत आहेत, अतिवृष्टीमुळे अनेक गावात पशु, जनावरे वातावरणामुळॆ दगावत  आहेत, सुरूवातीला धूळ पेरणी, दुबार पेरणी नंतर अतिवृष्टीने शेती पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे.

इस्लापुर, शिवणी जलधरा मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊसाने हाहाकार माजवला आहे. पिकांचे झालेले नुकसान तथा हवमान खात्याने वर्तवलेल्या आगामी संकटाचे अंदाज पहात सरकार आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना व आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता करण्याची व आगामी संकटापासुन सावध करण्याची आवश्कता आहे.

अतिवृष्टीच्या नुकसानामुळे हालदिवाल झालेल्या शेतकरी वर्गाला प्राथमिक मदत म्हणून सरकार व  प्रशासनाने प्रति हेक्टर २५ हजार मदत करावी तथा जनावरांसाठी पशु वैद्यकीय सुविधा गावा गावात तातडीने पोहचाव्यात अशी मागणी किसान सभेने केली आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय