Thursday, May 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ओडिशात आदिवासींवर कंपनी – सरकार चे जुलमी राज्य – डॉ. संजय दाभाडे

---Advertisement---
डॉ.संजय दाभाडे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

---Advertisement---

पुणे : ओडिशात आदिवासींवर कंपनी – सरकार चे जुलमी राज्य असल्याचा आरोप आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय दाभाडे यांनी केला आहे. तसेच देशभरात सर्वत्र हीच स्थिती असल्याचा आरोप करत आदिवासींचा राष्ट्रव्यापी दबाव नसल्याने आदिवासींची गळचेपी सुरू असल्याचे दाभाडे म्हणाले.

स्टेट ( स्टेट – शासन संस्था ) गेली २५० वर्षे आदिवासींवर जंगल, जमिनी हिसकावून घेण्यासाठी हल्ले करत आली आहे, असा गंभीर आरोप देखील केला.

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

तिलका माझी, बिरासा मुंडा, राघोजी भांगरे ह्यांनी तीव्र लढे दिले आहेत. आजही आदिवासींना लढणे भाग पडत आहेच. आदिवासींवर नेहमीच कंपनी सरकारे जुलूम करत आली आहेत. आताही काल १५ जानेवारीला जगतसिंगपुर जिल्हा, धिंकिया गावं, ओडिशा इथे पोलिसांकडून आदिवासींवर भीषण हल्ला केले असून ९ ते ११ वर्षाच्या मुलांपासून वयो वृद्धांना सुद्धा प्रचंड मारहाण करण्यात आली, असल्याचे दाभाडे म्हणाले.

दाभाडे म्हणाले, जिंदाल स्टील वेस्ट ( JSW) कंपनीला तिथं तब्बल ४५०० एकर जमीन हवी आहे. सरकार जबरदस्तीने तिथं प्लांट आणत आहे. सरकार नी भांडवलदार मिळून आदिवासींच्या जल जंगल जमीन ला उध्वस्त करू बघत आहेत. JSW च्या आधी तिथं posco घुसली होती. पण आदिवासींनी त्यास तीव्र विरोध केला. तिला ग्रीन ट्रीब्युनल ने देखील परवानगी नाकारली होती. त्यानंतर posco पळाली. 

विशेष लेख : वन निवासींवरील अन्याय थांबवा ! – डॉ. अजित नवले 

आता ओडिशा सरकारच्या आशीर्वादाने पुन्हा कंपनी राज सुरू होतय नी पोलिसांच्या बळाच्या जोरावर आदिवासींना दडपून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. कितीही बळ वापरले तरी आदिवासींनी प्रखर संघर्ष सुरू ठेवत आजपर्यंत होईल तेवढी जल – जंगल- जमीन वाचवली आहे. परंतु ही संकटे व आक्रमणे कमी न होता वाढत चालली आहेत. तथाकथीत विकासाच्या नावाने हे सारे सुरू आहे, असेही म्हणाले.

संविधान मधील ५ व्ता अनुसूचीत जल – जमीन ह्यास संरक्षण मिळाले असेल तरीही संविधान पायदळी तुडवून शासन संस्था व कॉर्पोरेट कंपन्या आदिवासींच्या अस्तित्वाला सुरुंग लावणयाचा सपाटा लावत आले आहेत. ह्यावर एकच उपाय म्हणजे देशभरातील आदिवासींची एकजूट व त्यांची राष्ट्रीय चळवळ उभी राहणं आवश्यक आहे, असे प्रखर मत डॉ. दाभाडे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा ! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा

बंपर भरती : ESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles