Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Mumbai : बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक

Mumbai : शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर चुकवेगिरी संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिन्स गोयल, (वय ५३) यांस दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आल्याची माहिती राज्य कर उपआयुक्त यांनी दिली आहे.

---Advertisement---

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीवर वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात कंपनी प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता खोटी बिले आणि बोगस वाहतूक पावत्या जारी करत असल्याचे आढळून आले. त्याद्वारे कंपनीने रूपये ६४.०६ कोटीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करून शासनाची फसवणूक केली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या सर्व कामकाजास व व्यवहारास जबाबदार असल्यामुळे प्रिन्स गोयल यांचा या फसवणुकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळून आले. ही संपूर्ण कार्यवाही षण्मुगाराजन एस. (भा.प्र.से.), राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-क तसेच नयना गोंदावले, राज्यकर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, विलास नाईक आणि अजित विशे, सहायक राज्यकर आयुक्त यांच्याकडून संयुक्तपणे राबविण्यात आली.

---Advertisement---

Mumbai

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर

वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !

पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles