Wednesday, February 12, 2025

CITU : आयुक्त व अतिरिक्त आयुक्त कार्यालयास सीटूचा घेराव 

आशांच्या मागण्यासह विविध घोटाळ्यांच्या गगनभेदी घोषणांनी केला महापालिकेचा उद्धार

नांदेड : सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने दि.१६ रोजी नांवाशमनपाच्या आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयास घेराव घालून आशांच्या मागण्यासह विविध मागण्या घेऊन गगनभेदी घोषणा देत महापालिकेचा संपूर्ण परिसर दनाणून टाकला.

उपायुक्त कारभारी दिवेकर आणि डॉ.पंजाब खानसोळे व वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन यांनी सीटूच्या शिष्टमंडळा सोबत सविस्तर चर्चा करून मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी आशा व गट प्रवर्तक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉ.विजय गाभने, जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड, उपाध्यक्षा कॉ.शिला ठाकूर यांच्यासह आशा व इतर युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

नांदेड शहरातील पूरग्रस्तांच्या अपहार व इतर घोटाळ्यांच्या मागण्याच्या घोषणानी महापालिका दनाणून गेली होती. १२ जानेवारी पासून आशा व गट प्रवर्तकांचा राज्यव्यापी संप सुरु असून राज्यातील ७७ हजार आशा संपावर आहेत. नांदेड मनपा मध्ये काही कंत्राटी वैद्यकीय अधिकारी शहरातील अशांना कोऱ्या मुद्रांकावर सह्या करण्यासाठी दबाव आणत आहेत, तसेच ओपीडी संपे पर्यंत दवाखान्यात थांबण्यास सांगत आहेत.ऑनलाईन कामाची सक्ती करीत आहेत.कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देत आहेत.महागाईच्या दरानुसार प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरु करावा.ह्या स्थानिक मागण्या होत्या.

मुख्यता शिंदे आणि फडणवीस सरकारने आशांना साडेसात हजार रुपयांच्या मानधन वाढीची घोषणा केली असून शासन आदेश काढण्यास कामचुकारपणा होत असल्याचा आरोप करीत राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

नांदेड महापालिकेच्या प्रमुख जबाबदार अधिकाऱ्याच्या कार्यालयास घेराव घालून संताप व्यक्त केला. मनपा समोर सीटू जिल्हा कमिटीच्या वतीने अमरण साखळी उपोषण सुरु करण्यात आले असून मनपा मधील पूरग्रस्तांच्या घोटाळ्यासह विविध घोटाळ्याची सीआडी व विभागीय समिती मार्फत चौकशी करून दोषींना सेवेतून बडतर्फ करावे आणि अपहारांची रक्कम वसूल करावी ह्या मागण्यासह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनामध्ये सीटूच्या राज्य कमिटी सदस्य कॉ.करवंदा गायकवाड, अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या नांदेड तालुका अध्यक्षा कॉ.लता गायकवाड अतिशा थोरात, सुनील अनंतवार आदींनी सहभाग नोंदविला.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles