Thursday, February 20, 2025

कॉ. देवयानी सत्येंद्र मोरे यांचे निधन !

मुंबई : दासगाव जनता प्रगतिशील संघ, मुंबईच्या माजी अध्यक्षा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जेष्ठ सदस्या कॉ. देवयानी सत्येंद्र मोरे यांचे दि. ७ मार्च रोजी, रात्री ८.३० वा. वोखार्ड हॉस्पिटल, मुंबई, येथे वयाच्या ८७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

कॉ. देवयानी मोरे या १९७०-८० च्या दशकात, कॉ. अहिल्याताई रांगणेकर, मृणाल गोरे, कॉ.सुभाषिनी अली, कॉ.सुमन संझगिरी, कॉ.प्रभा सावंत यांच्या सोबत महागाई विरोधी आंदोलन, लढ्यात सक्रिय होत्या, तसेच त्या श्रमिक महिला संघ, जनवादी महिला संघटना या संघटनेच्या कार्यात व केंद्रीय कर्मचारी संघटनेच्या कार्यातही नोकरी करीत असताना सक्रिय होत्या. त्या अखेर पर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य होत्या. त्यांच्या पश्चात सुबोध, नचिकेत, अतुल, दिनांत ही मुले, सुना व नातवंडे आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles