Tuesday, April 15, 2025
---Advertisement---
---Advertisement---

CNG Scooter : ऑटो एक्स्पो 2025 मध्ये टीव्हीएसची पहिली सीएनजी स्कूटर सादर

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध टीव्हीएसने ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये जगातील पहिली सीएनजी (CNG) स्कूटर सादर केली आहे. या स्कूटरमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल असलेल्या सीएनजी इंधनाचा वापर केला जातो. (CNG Scooter)

ज्यामुळे इंधन खर्चात कमी होईल आणि प्रदूषणातही घट होईल. टीव्हीएसच्या या नव्या इनोवेशनसह, कंपनीने पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहने बाजारात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Worlds First CNG Scooter

टीव्हीएस मोटर कंपनीने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये जगातील पहिली सीएनजी स्कूटर ज्युपिटर 125 सीएनजी सादर केली आहे. गेल्या वर्षी बजाजने जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली होती. त्यानंतर टीव्हीएसने जगातील पहिली सीएनजी स्कूटर लॉन्च करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

पॉवरफूल असणार इंजिन

या स्कूटरमध्ये 124.8 सीसी कॅपेसिटीचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. ज्यामुळे स्कूटरला 5.3 किलोवॅटची पॉवर आणि 9.4 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यासोबतच, पेट्रोल आणि सीएनजीसह स्कूटर 226 किमी पर्यंत रेंज देईल.

---Advertisement---

CNG Scooter

या सीएनजी स्कूटरची किंमतीबाबत अद्याप माहिती कंपनीने दिलेली नाही. पण ही स्कूटर नक्कीच ग्राहकांना परवडणारी अशा किंमतीत असणार आहे, सध्या टीव्हीएस ज्युपिटरच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 88000 रुपये (एक्स-शोरूम) ते 99000 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. अशा परिस्थितीत, सीएनजी स्कूटरची किंमत 90 हजार (एक्स-शोरूम) ते 99 हजार रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत असू शकते अशी अपेक्षा आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles