Tuesday, January 14, 2025
Homeराज्यब्रेकिंग : CNG आणि घरगुती गँस च्या दरात झाली वाढ, आज मध्यरात्रीपासून...

ब्रेकिंग : CNG आणि घरगुती गँस च्या दरात झाली वाढ, आज मध्यरात्रीपासून होणार लागू

मुंबई : देशभरात इंधन दरवाढीने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटरने शंभरी गाठली आहे, असे असतानाच आता पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. मुंबईत गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने आपल्या दरांमध्ये वाढ करत असल्याचे जाहीर केले आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात येणार आहे.

एमजीएलच्या सीएनजी तसेच पीएनजीच्या घरगुती ग्राहकांनाही ही झळ बसणार आहे. यामध्ये CNG च्या दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचा दर हा २.५८ प्रति किलो ग्रॅम इतका वाढला आहे. तर पीएनजीच्या दरात ०.५५ रूपयांनी वाढ झाली आहे.

मुंबई आणि आसपासच्या सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या सर्व करांसह सुधारित वितरित किंमती अनुक्रमे ₹ ५१.९८ / किलोग्राम आणि ₹ ३०.४०/ एससीएम (स्लॅब 1) आणि ₹ ३६.००/ एससीएम (स्लॅब 2) असतील.

गॅस पाइप लाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्चाचे अंशतः आच्छादन करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड (MGL) आपल्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) किंमतीत ₹ २.५८/ किग्रॅ आणि घरगुती पीएनजी (PNG) किंमतीत ₹ ०.५५ / ने वाढविले आहे. ही दरवाढ १३ जुलै २०२१ च्या मध्यरात्री पासून मुंबईत लागू केली जाणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय