ठाणे : ठाणे जिल्हातून जाणाऱ्या शिक्षकांना स्वजिल्हात जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या पाठपुराव्याला यश आलेचे माकपने म्हटले आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी आज ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनवणे व शिक्षण अधिकारी बडे याच्याशी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांंच्या बदली बाबत चर्चा केली. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा बदलीचा चौथा टप्पा दिनांक १० व ११ ऑगस्ट रोजी ऑनलाईन राबवला गेला. यानुसार राज्यातील १८९०शिक्षकांच्या जिल्हा बदलीच्या यादया ग्रामविकासने सर्व जिल्हा परिषदांना पाठवल्या. परंतु काही जिल्हा परिषदांची शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया अद्याप झाली नाही. यात ठाणे जिल्हा परिषदेचाही समावेश आहे.
जिल्ह्यातील ५५ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या कार्यमुक्तीसाठी आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे यांनी जिल्हा परिषदेच्या सिओ सोनवने यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. या वेळी औरंगाबाद माकपचे डॉ. भाऊसाहेब झिरपे सोबत होते. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी भागवत यांची बदली झाली होती. आता बडे यांनी कार्यभार स्विकारला असुन पुढील दोन दिवसात कार्यमुक्ती आदेश पंचायत समितीच्या शिक्षण विभागास पाठवले जातील असे सिओंनी सांगीतले. यामुळे ठाणे जिल्हातुन जाणाऱ्या शिक्षकांना स्वजिल्हात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.