सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कामगारांच्या बेमुदत संप आंदोलनाला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITU च्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
सिंधुदुर्ग मधील एकूण सात एसटी डेपो पैकी सहा एसटी डेपो मध्ये जाऊन आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचारी कामगारांना मार्गदर्शन, पाठिंबा दिला.
यावेळी प्रा. विनोदसिंह पाटील यांनी सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर युनियन चे कामकाज, त्यांचे लढे व त्यामुळे आशाना मिळालेले फायदे याचे अनुभव सांगितले.
तसेच त्यांना BUCTU, MFUCTO, AIFUCTO या प्राध्यापक संघटनेच्या लढाऊ कामकाज, एकजुटीने केलेले संघर्ष त्यामुळे प्राध्यापकांना मिळालेले लाभ याचीही माहिती दिली.
सिटूच्या या पाठिंब्यामुळे व अनुभवामुळे सर्व आंदोलक कामगारामधील उत्साह आणखी वाढीस लागला. एसटीचे शासनात विलीनीकरण होईपर्यंत एकजुटीने व निर्धाराने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.