Saturday, March 15, 2025

ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या मजूरीवाढीसाठी व सामंजस्य करार करण्याच्या मागणी घेऊन सिटू धरणे आंदोलन

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

जिल्हाधिका-यांना दिले शिष्टमंडळाने निवेदन

नांदेड : ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या मजूरीवाढीसाठी व सामंजस्य करार करण्याची मागणी घेऊन सिटू धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांची मजूरी व कमिशनवाढ आणि अन्य सुविधांबाबतच्या ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या त्रिपक्षीय सामंजस्य कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे सन २०२० – २१ चा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी मजरीवाढ आणि अन्य मागण्यांसंबधीचा नवीन त्रीपक्षीय सामंजस्य करार तातडीने करण्याची गरज आहे. मागील करारावेळी कराराची मुदत तीन ऐवजी पाच वर्षे करून आणि कराराचे एक वर्ष सोडून दिल्यामुळे या कामगारांचे प्रचंड मोठे नुकसान करण्यात आले आहे.तसेच कोविड – १९ च्या महामारीमुळे या कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या कामगारांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केल्याची घोषणा सरकारने केली आहे. त्याच्या कामकाजास अद्यापही सुरवात झाली नसल्यामुळे या कामगारांच्या कोणत्याही सामाजिक सुविधेचा लाभ मिळत नाही.ही वास्तविकता लक्षात घेऊन लवकरात लवकर त्रीपक्षीय बैठकीचे आयोजन करून नवीन सामंजस्य करार करण्यात यावा, या मागण्या चे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना नांदेड देण्यात आले. 

निवेदनावर कॉ. गंगाधर गायकवाड, मारूती केंद्रे, रविन्द्र जाधव, सं.ना.राठोड, मगदूम पाशा, दतोपंत इंगळे हे उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles