महाराष्ट्र रिक्षा पंचायततर्फे सर्वधर्मीय रिक्षा रिक्षाचालकांसाठी पुणे शहर पोलीस आयुक्त यांचे उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर तर्फे तसेच समर्थ पोलीस स्टेशनच्या सहकार्याने रिक्षाचालकांसाठी रमजान रोजा इफ्तार पार्टी पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडला तसेच रिक्षाचालकांना पाच लाख रुपये किमतीचा अपघाती विमा मोफत वाटप पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण 750 रिक्षाचालकांपैकी 60 रिक्षाचालकांना प्रतीकात्मक पाच लाख रुपये किमतीच्या अपघाती विमा वाटपाचे कार्यक्रम केले गेले.
पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे, शहरात येणाऱ्या नागरिकांना सर्वप्रथम रिक्षाचालक भेटतात. रिक्षाचालकांनी चांगली सौजन्यपूर्ण प्रवास सेवा दिली तर नागरिकांचे शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत चांगले मत तयार होते, रिक्षाचालक चुकीचे वागल्यास नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो. अनेक रिक्षाचालक खूप चांगले काम करत आहेत, कोविड काळात आरोग्य व्यवस्थेवर ताण आला, रुग्णवाहिका कमी पडल्या अशा वेळी रिक्षाचालकांनी नागरिकांना मोफत सेवा दिली. रिक्षात राहिलेले साहित्य, पैसे, सोने देणारे प्रामाणिक रिक्षाचालकांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे, असे मत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.
एसटीचा ब्रेक फेल झाल्याने पुण्यात भीषण अपघात, सात वाहनांना धडक
ब्रेकिंग : CNG च्या दरात पुन्हा वाढ, पुणेकरांना महागाईचा झटका
यावेळी बाबा कांबळे म्हणाले, प्रत्येक घटकांमध्ये चांगली वाईट घटक असतात. वाईट वागणारे रिक्षाचालक लक्षात राहतात, परंतु चांगले काम करणारे, प्रामाणिकपणे रिक्षात राहिलेले पैसे, सोने,परत देणाऱ्या रिक्षाचालकांचे कौतुक होत नाही. प्रामाणिक रिक्षाचालकांचे कौतुक झाल्यास इतरांना प्रेरणा मिळेल, रिक्षाचालकांना म्हातारपणी पेन्शन सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, आज आम्ही पाच लाखाचे मोफत अपघाती इन्शुरन्स दिला. लवकरच सामुहिक हेल्थ पॉलिसीबाबत मोठा निर्णय संघटना घेणार आहे, या कामी न्यू इंडिया इन्शुरन्सने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असे बाबा कांबळे म्हणाले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आरोग्य सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजीत वैद्य, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे व सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर व समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी विष्णू ताम्हाणे, ऍड. वाजिद खान, सामाजिक कार्यकर्ते अमित मोहिते तसेच न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी रुद्राषीश रॉय, प्रेमचंद मोरे, नितीन वाघ, प्रसन्नकुमार व महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे शहराध्यक्ष शफिक पटेल, बाळासाहेब ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर मध्ये 696 जागांसाठी मेगा भरती, आजच अर्ज करा !
कोरोना महामारी च्या काळात दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र रिक्षा पंचायत तर्फे 102 रिक्षासह पुणे शहरातील सर्व नागरिकांना 24 तास मोफत रिक्षा रुग्णवाहिका सेवा पुरवली गेली होती व त्याच्या वर्षपूर्ती दिवशी या सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही रिक्षाचालकांना पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच काही प्रामाणिक रिक्षाचालक ज्यांनी रिक्षामध्ये प्रवाशांची विसरलेली रोख रक्कम सोन्याचे दागिने किंवा मोबाईल वगैरे वस्तू प्रवासास परत दिला अशा रिक्षाचालकांचा पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यामध्ये कोविड काळात कोरोनाग्रस्त नागरिकांना महाराष्ट्र रिक्षा पंचायततर्फे आयोजित घर ते हॉस्पिटल मोफत रिक्षा ॲम्बुलन्स सेवेद्वारे मोफत सेवा देणे तसेच या काळात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा अंत्यसंस्कार करणे असे प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल रिक्षा चालक इब्राहीम इस्माईल शेख यांचा तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी कबर खोदण्याचे सत्कर्म केल्याबद्दल मौला शेख यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्रिमंडळ निर्णय : राज्य मंत्रिमंडळाचे तब्बल १० महत्वपूर्ण निर्णय
शिक्षक संवर्गातील 200 बिंदू नामावली रद्द करा, माकपची मागणी
महाराष्ट्र रिक्षा पंचायततर्फे आयोजित मोफत रिक्षा रुग्णवाहिका सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिक्षा चालकांपैकी अन्सारी शेख, महालिंग स्वामी,अयाज शेख, प्रवीण शिखरे, संदीप घुले, मुख्तार कोतवाल,हुसेन शेख यांचा सन्मान चिन्ह व विमा सत्कार करण्यात आला.
काही प्रामाणिक रिक्षाचालक ज्यांनी प्रवाशांचे रिक्षामधील विसरलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम किंवा मोबाईल इत्यादी प्रामाणिकपणे प्रवाशांना परत देऊन रिक्षाचालकांमध्ये आदर्श निर्माण केला अशा इस्माईल सय्यद, इरफान पिरजादे, इरफान अत्तार, उमेर शेख, अल्ताफ बागवान, सलिम सय्यद तसेच कष्टाळू व प्रामाणिक रिक्षाचालक ज्यांनी रिक्षा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत असताना मुलांना उच्च शिक्षण देऊन मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अपार कष्ट घेतले या अशा अनिल सावंत, धनंजय दिगंबर खेडकर या रिक्षाचालकांचा सुध्दा पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत 310 पदांसाठी भरती, 5 मे अर्ज करण्याची अंतिम तारीख
या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष शफिक पटेल, अरशद अन्सारी, मोहम्मद शेख कुमार शेट्टी, अयाज शेख, अविनाश वाडेकर, महालिंग स्वामी, किरण एरंडे, सलीम सय्यद, संजय गुजलेकर, अहमद शेख, प्रवीण शिखरे, मुक्तार कोतवाल, विल्सन मस्के, शाहरुख सय्यद, अंकुश ओंबळे, तोफिक कुरेशी, अकबर शेख व इतर सहकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शफीक पटेल यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक मुराद काजी यांनी केले तसेच बाळासाहेब ढवळे यांनी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे तसेच रिक्षाचालकांचे आभार मानले.
– क्रांतिकुमार कडुलकर