Saturday, December 7, 2024
Homeग्रामीणचिपळूण : नारायणगाव येथील चव्हाण कुटुंबियांना आ. बेनके यांची मदत !

चिपळूण : नारायणगाव येथील चव्हाण कुटुंबियांना आ. बेनके यांची मदत !

चिपळूण : राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला, अनेकांचे संसार उघड्यावर आले. अशा परिस्थितीत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी चिपळूणवासीयांना मदतीचा हात दिला.

चिपळूण आणि परिसरात मदतकार्य चालू असताना जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील चव्हाण कुटुंबियांची आज भेट झाली. याभेटी प्रसंगी या कुटुंबातील माया अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस केली. माया चव्हाण यांचा मुलगा अतुल हा ड्रायव्हिंग चे काम करतो व चव्हाण कुटुंब चिपळूणमध्ये मासेविक्रीचा व्यवसाय करते.

पुरामुळे त्यांच्या कुटुंबाचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले त्याचप्रमाणे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे व अन्नधान्याचेही मोठे नुकसान झाले. चव्हाण कुटुंबियांना पुन्हा उभं राहण्यासाठी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत यावेळी देण्यात आली.

याप्रसंगी राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे व आ. शेखर निकम, जि.प. सदस्य मोहित ढमाले, सुरज वाजगे व अन्म मान्यवर माझ्या समवेत उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय