चिखली : जाधववाडी येथील शिवसेना पदाधिकारी राजू भुजबळ यांनी स्वतःचा वाढदिवस आणि शिक्षक दिन सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा केला. जाधववाडी येथील अंध आणि अपंग नागरिकांसाठी त्यांनी मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे. या प्रभागात ५५ अंध अपंग नागरिक आहेत, त्यांना नोकरी, व्यवसाया निमित्त तसेच दवाखान्यात जाण्यासाठी भोसरी, निगडी, पिंपरी, आकुर्डी, प्राधिकरण येथे जावे लागते. त्यांचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित व्हावा, आणि त्यांना तातडीने सुविधा मिळावी यासाठी स्वखर्चाने ही सेवा सुरू केली आहे, असे शिवसेना नेते राजू भुजबळ यांनी सांगितले.
या निमित्ताने त्यांनी गरजू १५० कुटुंबाना शिधा वाटप केले. तसेच अंगणवाडी जाधववाडी येथे पिंपरी चिंचवड ब्लड बँकच्या सौजन्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. डॉ ए बी पाटील, डॉ. मनोज मोरे, आरोग्य सेवक जावेद शेख यांनी रक्तदान शिबिराचे संयोजन केले होते, त्यावेळी ४५ जणांनी रक्तदान केले.
यावेळी अंगणवाडी शिक्षिका रंजना ढमाल यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास नगरसेविका अश्विनी जाधव, युवा नेते संतोष जाधव उपस्थित होते.
तसेच, राहुल गरड, अण्णा चौधरी, मोहन रणदिवे, देविदास शिंदे, दिगंबर सोनवणे, रामा त्रिभुवन, श्रीराम गाडेकर, जगदीश परिट, भारत नरवडे, नाना आहेर, शंकर घंटे, देविदास खिस्ते यांनी या सामाजिक उपक्रमाचे संयोजन केले.