Tuesday, January 21, 2025

चिखली : प्रशासनाच्या मदतीला धावली नगरसेविका

चिखली (पिंंपरी) : प्रभाग २ जाधववाडी, राजेशिवाजी नगर, कुदळवाडी या प्रभागात साई जीवन प्राथमिक शाळेमध्ये चालू असलेल्या कोविड १९ लसीकरण मोहीम आज लाईट नसल्यामुळे बंद पडली होती.

या ठिकाणी नगरसेविका अश्विनी संतोष जाधव यांनी तात्काळ या ठिकाणी जनरेटर उपलब्ध करुन दिले व लसीकरण मोहीम पुर्वरत चालू करुन घेतली.

मनपाच्या आरोग्य विभागाला लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज असते. नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या संवेदनशीलतेचे नागरिक कौतुक करत आहेत.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles