Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत सुरू होणार ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’

Chief Minister Medical Assistance Cell : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष (Cm Relief Fund) आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच सहाय्य मिळण्याची सोय होईल, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

---Advertisement---

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला होता. मात्र, नागरिकांना मंत्रालयात वारंवार येण्याची गरज भासू नये म्हणून ही सुविधा जिल्हास्तरावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निधी अर्ज प्रक्रियेत पेपरलेस प्रणाली (Cm Relief Fund)

गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया आता पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार आहे. तसेच, स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करून धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाइन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) एकत्रित करण्यात येणार आहे. यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक गतिशील आणि सोपी होणार आहे.

---Advertisement---

तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन

अर्थसहाय्याच्या रकमेचा आढावा घेण्यासाठी आणि दुर्धर आजारांवरील आर्थिक सहाय्याचे प्रमाण वाढवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत उपचारांसाठी लागणाऱ्या वाढत्या खर्चाचा विचार करून सहाय्याची रक्कम नव्याने निश्चित केली जाणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची महत्त्वपूर्ण भूमिका

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील हजारो गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Airtel, Jio आणि Vi चे कॉलिंगसाठी नवे प्लॅन लाँच, वाचा सर्वात स्वस्त प्लॅन कोणता 

सामान्य नागरिकांना महागाईचा झटका ; बस, टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ

पुण्यात भीषण अपघात! नियंत्रण सुटलं; डंपरखाली दोन तरुणींचा मृत्यू

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची गळा दाबून हत्या ; पतीला जन्मठेप

हनीमुनपूर्वी सासरच्यांकडून वधूची व्हर्जिनीटी टेस्ट, न्यायालयाचा मोठा दणका

भंडाऱ्यातील कंपनीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, अनेक कर्मचारी गंभीर जखमी

सामान्य नागरिकांना महागाईचा झटका ; बस, टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ

थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता, आशियामधील ठरला तिसरा देश

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles