कोल्हापूर : डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथील इतिहास विभाग व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस यांचे ‘छत्रपती शिवरायांच्या संबंधीचे वाद – विवाद आणि विवेकवादी भूमिका’ या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे विवेकवादी विचारांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील सैनिक हे जात जाणिव वजा करून उभे केले. या स्वराज्यात हिंदू – मुस्लिम एकत्र नांदत होते. याच स्वराज्यातील मुस्लिम हे स्वराज्याशी एकनिष्ठ होते. या मुस्लिमांनी इस्लाम धर्मही सोडला नाही व स्वराज्य निष्ठाही सोडली नाही.
महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला, “या” जिह्यात उष्माघाताचा पहिला बळी
महागाईचा भडका सुरूच, पेट्रोल 115 पार, तर डिझेलची शंभरी पार
पुढे ते असेही म्हणाले की, छत्रपतींना धर्म जात नसते. परंतू काही ब्राह्मण इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही चुकीची निरिक्षणे नोंदविली. रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे ही सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा विवेकवादी विचार त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडला.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ प्रवीण चौगले यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा. ए. एच. फारणे यांनी केले. तर आभार डॉ संतोष जेठिथोर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदिप वाडीकर यांनी केले.
आरोग्य सल्ला : रणरणत्या उन्हात अशी घ्या त्वचेची काळजी !
यावेळी विवेक वाहिनी प्रमुख आबासाहेब चौगले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.