Saturday, April 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महाराष्ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ – ऐतिहासिक गडकिल्ल्यांना जोडणारी आयकॉनिक रेल्वे टूर लवकरच सुरू

मुंबई (वर्षा चव्हाण) : महाराष्ट्रात ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांना देशभरातील पर्यटकांशी जोडण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वेव्ह्स समिट 2025’च्या पार्श्वभूमीवर ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ (Chhatrapati Shivaji Maharaj Circuit) या नावाने एक खास 10 दिवसांची आयकॉनिक रेल्वे टूर सुरू होणार असल्याची घोषणा केली.

---Advertisement---

या टूरद्वारे महाराष्ट्रातील गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या परिसरांना रेल्वेमार्गे एकत्र जोडण्यात येणार आहे. यामुळे देशभरातून पर्यटकांना या स्थळांना भेट देणे अधिक सुलभ होणार आहे. (हेही वाचा – UPI Down : GPay, PhonePe, Paytm ची सेवा ठप्प; वापरकर्ते हैराण)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत सांगितले की, महाराष्ट्रात रेल्वे विभागाकडून तब्बल 1 लाख 73 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सुरू असून, गोंदिया-बल्लारशाह मार्गाचे दुहेरीकरण, तसेच छत्तीसगड व तेलंगणाशी जोडणाऱ्या मार्गांचा विकास यामुळे राज्याचा व्यापार वाढणार आहे. (हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध ; वाचा काय आहेत नवीन अपडेट)

---Advertisement---

केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. यावर्षी रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी 24 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, मागील काही वर्षांपासून दरवर्षी राज्याला 23 ते 25 हजार कोटी रुपयांचा निधी मिळतो आहे. (हेही वाचा – खासदारानं संसदेत सलग २५ तास भाषण देऊन केला विक्रमी, म्हणाला आपला देश संकटात आहे…)

‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ (Chhatrapati Shivaji Maharaj Circuit) या प्रकल्पामुळे केवळ पर्यटनच नव्हे, तर इतिहासप्रेमींना आणि विद्यार्थ्यांनाही महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाशी थेट नातं जोडण्याची अनोखी संधी मिळणार आहे. ही 10 दिवसांची रेल्वे टूर लवकरच सुरू होणार असून, राज्यातील ऐतिहासिक स्थळांना देशव्यापी ओळख मिळवून देणाऱ्या या योजनेचे सर्वत्र स्वागत होत आहे. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles