मुंबई : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आजाद मैदानात उपोषण करत आहेत. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून छत्रपती संभाजीराजे यांची प्रकृती खालावली आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांचे आमरण उपोषण सुरूच आहे. संभाजीराजे यांची आज सकाळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती खालावली असून रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले. तसेच, अशक्तपणा व तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत असल्याचे सांगण्याच येत आहे. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिला आहे.
आग्या मोहळ मधमाशांचा विद्यार्थ्यांवर हल्ला, १ गंभीर तर ३० जखमी
मराठा समाजातील बहुतांश लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आरक्षणाचा लढा मी लढत आहे. माझ्या या लढ्याला मराठा समाजातील सर्व बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने रविवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले होते. त्यावेळी वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, छत्रपती संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
Kiss : चुंबनाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !