आळंदी / अर्जुन मेदनकर : देशाचे लक्षवेधून घेत असलेली ऐतिहासीक चांद्रयान मोहीम ३ हि यशस्वी व्हावी यासाठी वेदपाठ शाळा यांच्या वतीने वेदमंत्र जयघोषात माऊली मंदिरातील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात श्रींना साकडे घालण्यात आले.
यावेळी वेदपाठशाळेचे मुकेश दंडवते गुरुजी, श्रींचे पुजारी राजेंद्र पोफळे, ज्ञानेश वाघमारे, संकेत वाघमारे, वेद पाठशाळेचे साधक विद्यार्थी आलोक पाठक, अजिंक्य जोशी, राधेय वैद्य, वेदांत नाबरीया, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, उमेश बागडे महाराज, युवा उदयोजक राहुल चव्हाण, अर्जुन मेदनकर, सचिन शिंदे, महादेव पाखरे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील प्रथापरंपरांचे पालन करीत श्रींचे क्षेत्रोपाध्ये पुजारी आणि वेद पाठशाळेत गुरुजी, साधक विद्यार्थी यांचे वेद मंत्र जयघोषात श्रींची पूजा, अभिषेख करीत देशकल्याणार्थ वेद मंत्रजयघोष करीत चांद्रयान मोहीम ३ यशस्वीतेस श्रीना साकडे घालण्यात आले. चांद्रयान मोहीम ३ यशस्वी झाल्यानंतर उपस्थित स्थानिक नागरिकांसह देशवासीयांनी सर्वत्र जल्लोष करीत या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या इस्रो शास्त्रज्ञाचे तसेच संबंधितांचे अभिनंदन केले.