मुंबई : उत्सुकता असलेल्या दहावीचा निकाल काल आॅनलाईन जाहीर झाला आहे. निकालानंतर आता अकरावीच्या प्रवेशाची तयारी सुरु झाली आहे. त्यात शिक्षणमंडळाने आता अकरावी प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 19 जुलैपासून ऑनलाइन नोंदणी ची सुरुवात होणार आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट पर्यंत घेण्यात येणार असून ओ एम आर उत्तरपत्रिकाद्वारे ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे नऊ जुलै पासून सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल99. 95% लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात मुलींचा निकाल99. 96% तर मुलांचा निकाल 99.94% आहे.
– संपादन : आरती निगळे