पुणे : सेट उत्तीर्ण उमेदवाराचे प्रमाणपत्र हे जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करूनच देण्याची मागणी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडे केली आहे.
जुन्नर : गणपत घोडे यांची तालुकास्तरीय रोजगार हमी योजनेच्या सदस्यपदी निवड !
सेट विभागाकडून घेतली जाणारी सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेमध्ये खोटे प्रमाणपत्र सादर करून सेट उत्तीर्णचे प्रमाणपत्र मिळविले जात असल्याचे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाने म्हटले आहे, त्यामुळे अनुसूचित जमातीतील एस. टी उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे संघटनेने म्हटले आहेेेे. यासाठी एखाद्या उमेदवाराला सेटचे प्रमाणपत्र देत असताना त्याचे फक्त जात प्रमाणपत्र पडताळणी करून न देता त्या उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करूनच त्या उमेदवाराचे सेट उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेळी पालन योजना महाराष्ट्र, 75% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु, लगेच भरा!
या निवेदनावर डॉ. मंगेश मांडवे, राजू घोडे, सोमनाथ निर्मळ, अशोक पेकारी, ज्ञानेश्वर शेळके, संजय साबळे, स्नेहल साबळे, संदिप मरभळ आदिंच्या सह्या आहेत.