Thursday, December 5, 2024
Homeजुन्नरजुन्नर : शिक्षक समिती दिनदर्शिका 2022 - प्रकाशन सोहळा

जुन्नर : शिक्षक समिती दिनदर्शिका 2022 – प्रकाशन सोहळा

जुन्नर : जुन्नर तालुका, प्राथमिक शिक्षक समिती दिनदर्शिका 2022 प्रकाशन सोहळा आज राजा शिवछत्रपती सभागृह शिक्षक पतसंस्था जुन्नर येथे समितीच्या शिलेदारांच्या उपस्थिती संपन्न झाला.

दिनदर्शिकेचे हे ८ वे वर्ष….. सलग आठ वर्षे दिनदर्शिका छपाई व वाटप करण्याच्या संदर्भात अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सर्व समिती टीम ने जे कष्ट केले त्याबद्दल समिती शिलेदारांनी सर्वांचे आभार मानले.

हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला

न्यायाची चाड व अन्यायाची चीड या उक्तीप्रमाणे  शिक्षकांना आधारभूत मानून, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहून समितीचा वटवृक्ष बहरवण्यासाठी प्रयत्न करू अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या. 

जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी समितीची वाटचाल, समितीचा कार्य लेखाजोखा , समिती राबवत असलेले विविध उपक्रम, शिक्षकांसाठी समितीची तळमळ धडपड, शिक्षकांप्रति समितीची आदर भावना यावेळी व्यक्त केली. समिती चे कार्य प्रत्येक शाळेत पोहचवणा-या समिती शिलेदारांचे कौतुक केले.

हेही वाचा ! पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा नाही भीती वाटली; पंतप्रधान मोदींवर जोरदार टिका

प्रकाशन प्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब लांघी, सरचिटणीस राजेश दुरगुडे, कोषाध्यक्ष नितीन नहिरे, प्रवक्ते प्रशांत बावबंदे, तालुका नेते नामदेव मुंढे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण मराडे, उपाध्यक्ष विठ्ठल जोशी, शिक्षण सेवक प्रतिनिधी सागर भवारी, इत्यादी प्रतिनिधीनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रतिनिधी विलासराव साबळे यांनी केले व आभार उपाध्यक्ष राजेंद्र गारे यांनी मानले.

हेही वाचा ! तामिळनाडूच्या धर्तीवर रेशनदुकानात जीवनावश्यक पुरवठा करण्याची मागणी

हेही वाचा ! शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

संबंधित लेख

लोकप्रिय