हडपसर / डॉ.अतुल चौरे : आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२२-२३ हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार जगभरात ‘२०२३ आंतरराष्ट्रीय ‘पौष्टिक तृणधान्य वर्ष’ (Millet Year) म्हणून साजरे करण्यात येत आहे. संपूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्याविषयी जनजागृती सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागामार्फत तृणधान्याचे प्रदर्शन (Millet Exhibition) आणि तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी उपक्रम राबविण्यात आला.
त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य (Millet Diet) पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच नागरिकांच्या आहारामध्ये तृणधान्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पौष्टिक तृणधान्याच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत व्यापक स्वरूपात विद्यार्थ्यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली.
तृतीय वर्षाचे माजी विद्यार्थी सुशांत कांबळे, सेजल चिंचकर, स्वराली चौधरी, अश्विनी चुलबुले, दिव्या पै, श्रावणी चव्हाण, मनोज्ञा पोण्णागंटी यांनी विविध तृणधान्यांची ओळख करून दिली. प्रदर्शनामध्ये तृणधान्य व खाद्यबियांचे एकूण 300 पेक्षा जास्त प्रकार ठेवण्यात आले होते. ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवावी आणि प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडावे यासाठी प्राचार्य डॉ. एन एस गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. शुभम काशीद यांनी बाजरी, नाचणी, राजगिरा, राळा इत्यादी तृणधान्याचे आहारातील महत्त्व समजून सांगणारे पोस्टर तयार करण्यास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. कारकर मॅडम यांनी विविध तृणधान्यापासून खाद्यपदार्थ निर्मिती, त्याचे मार्केटिंग व ब्रॅण्डिंग करावे असे मार्गदर्शन केले.
प्रदर्शनासाठी उपप्राचार्य प्रा. संजय जडे, प्रा. डॉ. किशोर काकडे, प्रा. डॉ. संजय जगताप, कार्यालय प्रमुख श्री शेखर परदेशी, वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. शिल्पा शितोळे, प्रा. ऋषिकेश खोडदे, प्रा. डॉ. हेमलता कारकर, प्रा. डॉ. रंजना जाधव, प्रा. किसन पठाडे, प्रा. दत्ता वसावे, प्रा. शुभम काशीद, प्रा. वैभव कोडलिंगे उपस्थित होते. प्रा. ऋषिकेश खोडदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करा – संभाजी ब्रिगेड ची मागणी