Friday, April 19, 2024
Homeजिल्हाआशा व गटप्रवर्तकांना केंद्र सरकारने किमान वेतन द्यावे, तीव्र लढा उभारण्याचा इशारा

आशा व गटप्रवर्तकांना केंद्र सरकारने किमान वेतन द्यावे, तीव्र लढा उभारण्याचा इशारा

कामगार विरोधी केंद्रातील सरकार सत्तेवरून पायउतार करा – कामगार नेते तुकाराम भस्मे यांचे आवाहन

जिल्हा अध्यक्षपदी रेखा मोहड व जिल्हा सचिवपदी प्रफुल्ल देशमुख यांची निवड

अमरावती : आयटक च्या नेतृत्वात आजपर्यंत आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी दिल्ली, मुंबई, नागपूर व जिल्हा पातळीवर अनेक आंदोलन केली. परंतु त्यांच्या मानधनात फक्त तुटपुंजी वाढ करून सरकार त्यांची थट्टा करत आहे. प्रचंड वाढलेल्या महागाईत कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाची संपुर्ण धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. परंतु त्यांना ना धड मान नाही योग्य मानधन. मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली होती त्या कामामध्ये आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी अगदी तुटपुंज्या मानधनात महत्वाची भूमिका बजावली होती. एवढेच नाही तर आरोग्य विभागाचे 78 प्रकारचे कामे त्यांच्या कडून राबवून घेतले जातात. परंतु, त्या बदल्यात मिळणारे अत्यल्प मानधन सुधा चार चार महिने मिळत नाही ही अत्यंत संताप जनक बाब आहे काही कामे तर विना मोबदला त्यांच्या कडून बळजबरीने करवून घेतले जातात. केंद्र सरकारने 2018 पासून आशा व गट प्रवर्तक ना मानधनात वाढ केलेली नाही . मात्र जगण्याचे सर्व वस्तू प्रचंड महागाई वाढ झालेली आहे गरगुती गॅस दरवाढ झाली आहे. मात्र, मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. यामुळे केंद्र सरकार ने त्वरित मानधन वाढ करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना आयटक चे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी अमरावती जिल्हा अधिवेशनात दिला.

गटप्रवर्तकांना राज्य सरकारने आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी प्रमाणे सामावून घेतले पाहिजे. गट प्रवर्तकांना संघटित करून लढण्याचा इशारा दिला. राज्यभर 10 ते 30 ऑगस्ट 2022 आशा व गटप्रवर्तक आंदोलन करणार आहेत ते यशस्वी करावेत असे आवाहन केले.

आरोग्य खात्यातील 50 टक्के रिक्त जागा पात्रतेनुसार आशा व गट प्रवर्तक मधून भरा, या शिवाय अन्य मागण्यांसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी व संघटना बळकट करण्यासाठी येत्या 30 जुलै 2022 रोजी आशा व गट प्रवर्तक संघटनेचे जिल्हा मेळावा बाबासाहेब वऱ्हाडे मंगल कार्यालय पंचवटी अमरावती येथे सकाळी 12 वाजता आयोजित केला होता.

केंद्रातील मोदी सरकारने कामगार विरोधी कायदे अंमलात आणली, कामगारांनी लढे लढुन मिळविले कायदे या सरकारने बदलुन कामगार विरोधी कायदे आणली अश्या सरकार ला सत्तेतुन पाय उतार करण्याचे आवाहन मेळाव्याचे उदघाटक कॉ. तुकाराम भस्मे कामगार नेते तथा भाकपचे राज्य सचिव यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष काॅ. जे.एम. कोठारी तसेच प्रमुख मार्गदर्शक काॅ.शामजी काळे राज्य सचिव आयटक यांनी कामगारांनी केंद्र सरकार विरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. यावेळी आशांचे प्रश्न रेखा मोहड तर गटप्रवर्तकांचे प्रश्न मंगला बावनेर यांनी मांडले. तसेच आयटक च्या माध्यमातून मिळालेल्या मानधन वाढिबाबत संघटनेचे आभार मानले. अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका धसटक यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्ज्वला चौधरी यांनी केले.

संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड प्रफुल्ल देशमुख यांनी आशा व गट प्रवर्तक लढा आता किमान वेतन साठी तीव्र करण्याचा इशारा दिला. संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष कॉ. रेखा मोहड, कार्याध्यक्ष विद्या रामटेके, गटप्रवर्तक अध्यक्ष उज्वला चौधरी, जिल्हा सहसचिव सुषमा रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष ललीता सहारे , उपाध्यक्ष आशा गायगोले, कोषाध्यक्ष ललीता ठाकरे , प्रमिला ठवरे, वनिता कडु, शुभांगी कडु, स्वाती बाईस्कर, अंजली तानोड, योगिता गोरले, प्रज्ञा मोहड, वैशाली पाटील, निषा सुपले, अनिता लव्हाळे, वैशाली हिवराळे, कांताताई इंगोले, संध्या शर्मा, अर्चना खांडेकर, वंदना वाकडे, दिपाली घाटे, विजया जनवर, संजिवनी पटेल, संध्या जावरकर, ममता व्यवहारे ममता धनोकार, पदमा माहुलकर, सह मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय