Friday, February 21, 2025

केंद्राचा समलैंगिक विवाहासंदर्भात मोठा निर्णय

पुणे : केंद्राने एलजीबीटीक्यूआय समुदायासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. समलैंगिक विवाहासंदर्भात एका याचिकेवर आज (दि.०३) सुनावणी झाली. यामध्ये केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी केंद्र सरकार समलैंगिक विवाहासंदर्भातील या याचिकेवर सकारात्मक असून, एलजीबीटीक्यूआय समूदायांच्या समस्यांसाठी समिती गठीत करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच LGBTQIA+ समुदायाच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी समिती स्थापन करण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शवली आहे. असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

केंद्र सरकारने 3 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, LGBTQIA+ समुदायाच्या सदस्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या वास्तविक, मानवी समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करेल. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी समलिंगी विवाह प्रकरण घटनापीठासमोर सादर करत, एलजीबीटीक्यूआय समुदायासंदर्भात ‘सरकार सकारात्मक आहे,’असे स्पष्ट केले आहे.या एलजीबीटीक्यूआय समुदायाच्या समस्या मंत्र्यांपर्यंत न पोहचता त्या समितीकडूनच सोडवल्या जाव्यात म्हणून, केंद्र सरकारकडून या समुदायासाठी ही समिती गठीत करण्यात येत आल्याचे सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles