Tuesday, April 23, 2024
Homeग्रामीणअकोल्यात हुतात्मा नाग्या कातकरी स्मृती दिन साजरा !

अकोल्यात हुतात्मा नाग्या कातकरी स्मृती दिन साजरा !

अकोले : आज आपण ज्या स्वतंत्र भारतात श्वास घेतो आहोत, त्यामागे लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे, त्याग तपस्येची गाथा आहे. भर तारुण्यात स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या वीरांचे योगदान आहे त्यांचे स्मरण करणे व त्यापासून प्रेरणा घेणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जनजाती कल्याण आश्रम उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष व मॉर्डन हायस्कुल अकोले प्राचार्य संतोष कचरे यांनी केले. 

हेही वाचा ! अखेर कन्हैय्या कुमार कॉंग्रेसच्या गळाला !

वनवासी कल्याण आश्रम केंद्र अकोले येथे  हुतात्मा नाग्या कातकरी याचा स्मृती दिन साजरा करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

विशेष लेख : जुन्नरला आलेला पहिला रशियन पाहुणा !

या प्रसंगी कल्याण आश्रमाचे प्रांत शिक्षा आयाम प्रमुख रामदास सोनवणे, कल्याण आश्रमाचे उत्तर नगर जिल्हा सचिव सचिन सोमवंशी, तसेच कल्याण आश्रमाचे तालुकाध्यक्ष योगेश देशमुख, एस. इ. जोशी, कल्याण आश्रमाचे विध्यार्थी व पालक  कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थिती होते. सूत्र संचलन व आभार जनजाती कल्याण आश्रम गुहक वसतिगृह अकोले केंद्रप्रमुख शिवदास पाडवी यांनी केले.

हेही वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय