Bhosari, पुणे (दि. ८) : भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) हैद्राबाद व भोपाळ येथे राष्ट्रीय पातळीवरील नीट परीक्षेत उच्च श्रेणीत यश मिळवून एम.बी.बी.एस.च्या प्रथम वर्षात प्रवेश मिळवलेल्या यश संजय गायकवाड व दीपक सिद्धार्थ पवार या दोन विद्यार्थ्यांचा आदर्श समाज विकास संघाच्या वतीने आज इंद्रायणी नगर, भोसरी येथे डाॅ. किशोर खिल्लारे, सहयोगी प्राध्यापक मेडिसीन विभाग, डाॅ डि वाय पाटील मेडिकल कॉलेज, पिंपरी ह्यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (bhosari)
दोन्ही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून, त्यांनी कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचा गौरव म्हणून उपस्थितांनी त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा धनादेश देऊन त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली. (bhosari)
सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना संबोधित करत शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. “समाजातील सर्वांनी आपल्या मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात पुढे नेले पाहिजे आणि अशा यशस्वी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला पाहिजे,” असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस होते, तर सूत्रसंचालन अमरनाथ तायडे यांनी केले. संतोष मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात नामदेव वाळके, मुरलीधर गणवीर, विशाल रोकडे, विजय भालेराव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती