Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआयटक कामगार केंद्राकडून महिला दिन उत्साहात साजरा

आयटक कामगार केंद्राकडून महिला दिन उत्साहात साजरा

बार्शी : आयटक कामगार केंद्र बार्शी यांच्यावतीने जागतिक महिला दिन 8 मार्च 2022 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. गीतांजली पाटील, अॅड. सुप्रिया गुंड, प्रा. माधूरी शिंदे या उपस्थित होत्या.

डॉ. गितांजली पाटील यांनी स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत मार्गदर्शन केले तसेच अॅड सुप्रिया गुंड यांनी स्त्री हक्कांचे कायद्यांबाबत मनोगत व्यक्त केले,  प्रा.माधुरी शिंदे यांनी स्त्रीयांनी अंधश्रद्धा व परंपरेच्या जोखडातून मुक्त होऊन आनंदी राहण्याचा सल्ला दिला.

महाराष्ट्रातील तीन महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

ब्रेकिंग : भरतीसाठी १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त; तर १ हजार ७०० पदांसाठी लवकरच होणार भरती !

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड शौकत शेख यांनी तर सुत्रसंचलन कॉम्रेड मनिषा मस्तुद यांनी केले. यावेळी आयटक चे अध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे, प्रा. हेमंत शिंदे, सुरेखा शितोळे, लक्ष्मी नेवसे, सुवर्णा कांबळे, निर्मला सरवदे, शारदा पंढरपूरे, पूजा अवधूते, सुनिता निकम, शहापरी शेख, राणी पोटभरे, लहू आगलावे, अनिरुद्ध नखाते, डॉ.प्रवीण मस्तुद, किसन मुळे, भारत भोसले आदी उपस्थित होते.

भारतीय विमानाचे अपहरण करणारा पाकिस्तानी दहशतवादी ठार

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या एकूण ३५४ जागा, आजच अर्ज करा!

संबंधित लेख

लोकप्रिय