चांदवड (सुनिल सोनवणे) : प्राण्यांपासून मानवाला संक्रमित होऊ शकणाऱ्या रोगाचा धोका आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी बद्दल मार्गदर्शन पशुपालकांना केले. रेबीज, ब्रुसेलला, ॲनथकस, टिबी, Avian Influenza, Leptospirosis, Nipa, Ebola, swine Fever, Bird flu, Ecinococosis, Q Fever, Salmonella, Glander हे प्राणीजन्य आजार आहेत यासाठी यावर उपचार करून यापासून कसे बचाव करू शकतो, याबद्दल पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 चांदवड येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
चांदवड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या उपस्थितीत यावेळी चांदवड येथेही जागतिक प्राणीजन्य रोग दिन साजरा करण्यात आला. त्यांत ३ मांजर व १० कुत्रे यांना रेबीज रोगचे लसीकरण करण्यात आले. १३ जनावरेंचे लसीकरण केले. यावेळी डॉ. वैभव आहेर पशुधन विकास अधिकारी (गट अ), पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1, चांदवड ता. चांदवड, नाशिक गोकुळ अजृण चव्हाण व्रणोपचारक, चांदवड राजेश जावरे पशुधन पर्यवेक्षक, चांदवड पंचायत समिती दिपाली खाडिलकर पशुधन पर्यवेक्षक, चांदवड पंचायत समिती डॉ. पंकज कळसकर पशुधन विकास अधिकारी, दुगाव डॉ. दत्ता मोटेगावकर पशुधन विकास अधिकारी, बोपाने, शेबाज शेख,चांदवड हे सहभागी झाले. समीर काळे श्री वृंदावन एजन्सी चांदवड यांच्या सौजन्याने कार्यक्रम संपन्न झाला.