Tuesday, September 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडहमास-इस्रायल मध्ये युद्धविराम ! कतार व इजिप्तची यशस्वी मध्यस्थी-ओलिसांच्या सुटकेचा करार

हमास-इस्रायल मध्ये युद्धविराम ! कतार व इजिप्तची यशस्वी मध्यस्थी-ओलिसांच्या सुटकेचा करार

जेरुसलेम : 47 दिवसांच्या इस्रायल-हमास युद्धानंतर अखेर युद्धविराम झाला आहे.गाझामध्ये तोफांचे आणि लढाऊ विमानांचे आवाज थांबतील. अभूतपूर्व घडामोडीत इस्रायली कॅबिनेटने हमाससोबतच्या युद्धात युद्धविराम मंजूर केला आहे.त्या बदल्यात हमास 50 इस्रायली ओलीसांची सुटका करेल. संयुक्त राष्ट्रसंघाने यापूर्वीच युद्धविरामाची केलेली मागणी इस्राईलने फेटाळली होती,मात्र आंतराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर ईजिप्त, कतार, हमास, इसरायल यांच्यात युद्धबंदीचा करार कतार सरकारने जाहीर केला.

मंत्रिमंडळाने करारास मंजुरी दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इसरायलने प्रसारित केले आहे.येत्या 5 दिवसांत सुमारे 50 ओलिसांची सुटका करण्यात येईल,यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.पॅलेस्टाईनचे 150 कैदी इसरायल सोडणार आहे.असे कतार मध्ये हमासच्या प्रवक्त्याने वृत्त दिले आहे.कतार मध्ये हमासचे मुख्य कार्यालय आहे. 7 ऑक्टोबर पासून 46 दिवस सुरू असलेल्या या युद्धात 12 हजार पॅलेस्टाईन नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. युक्रेनयुध्दापेक्षा हे घनघोर युद्ध सुरू होते,गाझा पट्टी,इसरायल भोवताली होणारे हल्ले यामुळे संपूर्ण अरब जगात तसेच जगभर नागरिकांनी प्रचंड निदर्शने करून हमास व इसरायलचा निषेध केला आहे.



लाल समुद्रात कार्गो जहाजाचे खुले आम अपहरण झाल्यानंतर हे युद्ध भूमध्य समुद्र व लाल समुद्रात पसरण्याची भीती आंतरराष्ट्रीय युद्ध अभ्यासकांनी व्यक्त केली होती.जॉर्डन या प्रमुख मित्र देशाने तटस्थ भूमिका घेतल्यानंतर अमेरिकेला अरब जगताशी संबंध अबाधित ठेवण्यात अपयश येऊ शकते हे लक्षात आल्यावर युद्ध अधिक चिघळू नये,अशी युरोपची भूमिका सुरवातीपासून होती,युक्रेन युद्धामुळे युरोप आर्थिक मंदीच्या दिशेने जात आहे.सॅनफॅन्सीस्को येथे चीन व अमेरिकन अध्यक्षाची पाच दिवसांपूर्वी आर्थिक विकास सहमती बैठक झाली.त्यामुळे गाझा मधील युद्ध थांबण्याचे संकेत मिळाले आहेत,असे सूत्रांकडून कळते. हमासच्या दहशतवाद्यांनी अचानक इस्रायलवर हल्ला केला आणि सुमारे 240 ओलिसांचे अपहरण केले.सुमारे 1400 इसरायलचे निष्पाप लोक मारले गेले,मात्र हमास 20 लाख पॅलेस्टाईन नागरिकांचे प्रतिनधी नाहीत,असे पॅलेस्टाईन सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आले होते.



गाझामधील सर्व उध्वस्त, इसरायलचे आर्थिक नुकसान

इस्रायलने हमासबरोबरच्या युद्धाचा परिणाम म्हणून ऑक्टोबरमध्ये सुमारे 3 अब्ज शेकेल(इसरायल चलन) कर्जाचे पेमेंट पुढे ढकलले आहे.एकूण, सुमारे 117,000 कर्जे पुढे ढकलण्यात आली आहेत. बहुतेक गहाण आणि इतर ग्राहक क्रेडिटमध्ये, एकूण 2.7 अब्ज शेकेल ($727 दशलक्ष) कर्ज आहे. नोव्हेंबरमध्ये गोळा केलेल्या डेटामध्ये असे म्हटले आहे की, गेल्या महिन्यात कर्जाची देयके पुढे ढकलणाऱ्यांपैकी एक तृतीयांश असे इसरायली ग्राहक होते ज्यांना युद्धामुळे थेट नुकसान झाले होते -जे गाझा सीमेपासून 30 किमी परिसरातील रहिवाशी होते.त्यांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले होते.तसेच त्यांना युद्धासाठी राखीव ठेवण्यात आले होते.असे रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हा युद्ध बंदीचा करार यशस्वी झाला तर पॅलेस्टाईनच्या मूळ स्वतंत्र देशाच्या मागणी बाबत सकारात्मक दिशेने वाटचाल सूर होईल अशी अपेक्षा आहे.या युद्धामुळे इसरायलच्या बाबतीत जागतिक जनमत नकारात्मक बनले आणि लोकशाही मूल्ये मानवी स्वातंत्र्य दुर्लक्षित केले तर हमास सारख्या दहशतवादी संघटना जगाला त्रासदायक ठरू शकतात.हे महासत्तानी समजून घेतले पाहिजे.

संबंधित लेख

लोकप्रिय