Friday, March 29, 2024
HomeNewsसावधान पुणे, पिंपरी चिंचवड, शिरूरने ४२℃ ओलांडले.

सावधान पुणे, पिंपरी चिंचवड, शिरूरने ४२℃ ओलांडले.

पिंपरी चिंचवड : भारतीय हवामान विभागाने(IMD) पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरातील तापमान पुढील ४१℃ पेक्षा अधिकतम असेल असा इशारा दिला आहे. मावळ खोऱ्यातही उकाड्याने लोक हैराण झाले आहेत.शनिवारी शिरूर शहरात ४२℃ तापमान नोंद झाली आहे.

हवेतील आर्द्रता वाढली असून रात्री प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. ही उष्णतेची मोठी लाट असून शरीराचे डीहायड्रेशन टाळण्यासाठी दुपारी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हात फिरल्यास उष्माघात होऊ शकतो.उष्णकटिबंधीय क्षेत्रात हिंदी महासागराचे तापमान वाढलेले आहे.

उलटी, मळमळ, थकवा, भोवळ ही उष्माघात सुरू होण्याची लक्षणे आहेत, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. दारू, तिखट मांसाहारी खाऊन उन्हात फिरणाऱ्यांना सर्वात जास्त धोका आहे. आरोग्य बिघडू नये म्हणून WHO ने सुचवलेले ORS प्या. जर घरात मुले असतील तर त्यांना ते नक्कीच पिण्यास द्यावे. तसेच कोकम सरबत, ताक वरणभात आदी आहार या दिवसात घ्यावा. जागतिक तापमान वाढ सर्व जगभर जाणवत असून राज्याच्या काही भागात पाणी तुटवडा जाणवत आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय