Rohit sharma : भारतीय संघाने बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर इतिहास रचला आणि T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 7 धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दीर्घकाळ चाललेला दुष्काळ संपवण्यातही यश मिळविले. हे विजेतेपद पटकावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही T20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे.
Rohit sharma
T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्माने (Rohit sharma) पत्रकार परिषदेत सर्वांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. ज्यात तो म्हणाला की, T20 आंतरराष्ट्रीय मधील हा माझा शेवटचा सामना होता. मी या फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केल्यापासून प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे. मीही माझ्या कारकिर्दीची सुरुवात भारतीय संघासोबत याच फॉरमॅटमध्ये केली. या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाची वेळ यापेक्षा चांगली होऊ शकली नसती. मला चषक जिंकायचा होता. असेही रोहित शर्मा म्हणाला.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला, तर रोहित शर्मा आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विजय मिळवणारा पहिला कर्णधार बनला आहे. दुसरीकडे, रोहितसह विराट कोहलीनेही अंतिम सामन्यातील शानदार कामगिरीनंतर सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
हेही वाचा :
मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा
T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास
ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !
बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !
अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा
दुर्बल घटकांसाठी वाचा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा केल्या !