Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

कॅप्टन डॉ.संतोष जेठीथोर यांची मानद सचिवपदी निवड

कोल्हापूर : कागलच्या डी.आर. माने महाविद्यालयातील कॅप्टन प्रा. डॉ संतोष जेठिथोर यांची शिवाजी विद्यापीठ प्राध्यापकांची सहकारी पतसंस्था, कोल्हापूर च्या मानद सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

---Advertisement---

डॉ. संतोष जेठीथोर हे सुटा संघटनेच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहेत. सध्या सुटा संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारणीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासून सामाजिक संघटना व चळवळीच्या माध्यमातून एक हाडाचा कार्यकर्ता, त्याचबरोबर भारतीय संविधानाला अनुसरून अखंडितपणे ते सामाजिक सेवेत व चळवळीत कार्यरत आहेत.

पुरोगामी विचार व छ. शिवाजी महाराज-शाहू- फुले-आंबेडकर यांना प्रेरणास्थान मानून तसेच त्याच्या कार्याने प्रेरित होऊन ते सातत्याने कार्यमग्न असतात. सुटा संघटनेचे संस्थापक कालवश डॉ. संभाजीराव जाधव, प्रा.बाबा पाटील व प्रा. सुधाकर मानकर, प्रा. टी.व्ही स्वामी, प्रा.आर.जी.देसाई यांच्या कार्याने व विचाराने प्रेरित होऊन सुटा संघटनेमध्ये कार्यशील कार्यकर्ता म्हणून झटत असतात. सुटाच्या विविध आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून संघटनेच्या विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी आपल्या विचारांची नाळ प्राध्यापक हितार्थ जोडली आहे.

---Advertisement---

कॅप्टन डॉ. संतोष जेठीथोर यांनी एन.सी.सीच्या माध्यमातून ही राष्ट्रसेवा व समाजसेवा करण्याचे व्रत घेतले असून त्यासाठी ते सतत कठिबद्ध असतात. कडक शिस्त, वक्तशीर, अभ्यासू- प्रामाणिक व्यक्ती, चिकाटी व सहकार्याची भावना या त्यांच्या गुण वैशिष्ट्याच्या जोरावर त्यांनी अनेक घटकांना सहकार्य केले आहे. त्यांच्या या निवडीने तमाम घटकांच्यामधून अभिनंदन होत आहे.

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles