Saturday, December 7, 2024
Homeग्रामीणकिल्ले शिवनेरीवर सापडलेले तोफ गोळे वादाच्या भोवऱ्यात

किल्ले शिवनेरीवर सापडलेले तोफ गोळे वादाच्या भोवऱ्यात

जुन्नर (पुणे) : किल्ले शिवनेरी येथे बुधवार दि.३ मे २०२१ रोजी रोपवन फिरती दरम्यान वनरक्षक यांना तोफ गोळे आढळून आले होते. सदर ऐतिहासिक तोफगोळे वनविभागाने पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द केले आहेत. मात्र याबाबत सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मडके यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. 

त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, दि. ३ मे २०२१ रोजी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर कार्यरत असलेले वनरक्षक यांना फिरती दरम्यान ५ ऐतिहासिक दगडी तोफगोळे सापडले होते. सदरची बाब तेथे कार्यरत असणारे वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कळविणे बंधनकारक असतानाही कोणतीही माहिती न कळवता. परस्पर व आर्थिक लालसेपोटी त्यांचेच एका सहकार्यांस तसेच अन्य व्यक्तींना बोलावून घेऊन व संगनमत करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता फक्त तीन तोफगोळे सापलेबाबत फेसबुक लाईव्हद्वारे अनधिकृतपणे पुरावे नष्ट करण्याचा हेतूने प्रसारित केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच तेथे कार्यरत असणारे वनरक्षक व त्यांच्या सहकार्यानी दोन तोफगोळ्यांची हेराफेरी केली आहे. ज्यांची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. तसेच मडके यांनी सदर तक्रारी बाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

१. तोफ गोळे सापडले बाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देऊन जागेवर पंचनामा करणे आवश्यक होते मात्र पंचनामा करण्यात आलेला नाही.

२. अन्य ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वनरक्षकास जाणीवपूर्वक बोलावून घेऊन दोन तोफ गोळ्यांची हेराफेरी (चोरी) करण्यात आली. 

३. सदरची बाब अतिशय संवेदनशील असताना वरिष्ठांची परवानगी न घेता फेसुबक व इतर वृत्तपत्रांना देण्यात आली. 

४. सापडलेले तोफ गोळे विना परवानगी दोन दिवस स्वतःचे ताब्यात ठेवले.

५. पुरातत्व विभाग यांना जाणीवपूर्वक उशिराने दि. ५ मे २०२१ रोजी कळविले गेले व मुद्देमाल (तोफगोळे) त्यांचे ताब्यात देण्यात आले.

त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, जुन्नर वनपरिक्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात गड किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळे आहेत. यातील अनेक पर्यटन स्थळे ही इकोसेन्सिटिव्ह झोन, पेसा ग्राम  (अनुसूचित क्षेत्रा) मध्ये समाविष्ठ आहेत. वन विभागाचे हे वनरक्षक सामाजिक कार्याच्या आड गेले अनेक दिवसांपासून कार्यालयाची किंवा ग्रामसभांची कोणतीही परवानगी न घेता लालासेपोटी अवैध उत्खनन करून तेथे सापडलेल्या ऐतिहासिक मौल्यवान मुद्देमाल लांबवत आहेत. सदरचे चुकीचे चित्रीकरण करून फेसबुक व इतर माध्यमांवर प्रसारित करत आहेत. ऐतिहासिक दगडी तोफगोळे हेराफेरी प्रकरण अत्यंत संवेदनशील असून अश्या प्रकरणांना कायमचा आळा घालण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी. व दोषींवर कडक कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मडके यांनी केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय