मुंबई : मातंग आणि तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, विविध योजना राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन ‘आर्टी’चे (arti) व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. युवकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यावर तांत्रिक विभागाने गुगल फार्म ऐवजी ‘आर्टी’च्या संकेतस्थळावर उमेदवारांना नोंदणीसाठी नवीन अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. उमेदवारांनी याठिकाणी नोंदणी केल्यानंतर कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वंयरोजगारासाठी इच्छुक आहेत, त्यांच्या व्यवसायाकरिता आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु असल्याची माहिती वारे यांनी दिली.
(arti) असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस…
स्पर्धा परीक्षा: एमपीएससी, युपीएससी, बॅंक (आयबीपीएस), रेल्वे, जेईई- नीट, युजीसी- नेट/ सेट, पोलीस/मिलीटरी. कौशल्य विकास: परदेशात नोकरीसाठी लागणारे विविध कौशल्य प्रशिक्षण व परदेशी उच्च शिक्षणाची संधी, शेतीपूरक विविध व्यवसाय प्रशिक्षण, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, तसेच कॉम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भातील विविध कोर्सेसचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
योजना: पीएच. डी, पोस्ट पीएच. डी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)
नोंदणी कशी करावी
इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर करिअर हा पर्याय निवडावा आणि ऑनलाईन नोंदणी करावी. किंवा पुढील लिंकवर क्लिक करुन https://arti.org.in/arti-job ऑनलाईन अर्ज करावा.
हे ही वाचा :
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !
मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक
इन्फोसिसमध्ये 20,000 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा
भारतीय स्टेट बँक अंतर्गत 600 पदांची भरती, पात्रता – पदवी
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार