Thursday, January 23, 2025

वर्ष अखेरीस लसीकरण पूर्ण होण्याच्या थापा केंद्र सरकारने मारणे बंद करावे, सायरस पुनावाला यांची पंतप्रधानांवर परखड टीका

पुणे : देशात महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबई व पुणे या शहरांमध्ये वाढला होता. आजही पुणे ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव जाणवत आहे. देशातील कोरोनाचा पार्श्वभूमीवर लसिकरणाचे वर्षाला ११० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिन्याला दहा कोटी लसींचे उत्पादन करणे ही मोठी जिकरीची गोष्ट आहे. मात्र असं असले तरी आमचे प्रयत्न चालू आहेत. असे सांगून सायरस पुनावाला म्हणाले की, “भारत सरकाने वर्ष अखेरीस लसीकरण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र केंद्र सरकारने ‘थापा’ मारणे बंद करावे, अशी परखड टीका सायरस पुनावाला यांनी सरकारवर केली.

पुण्यातील एका कार्यक्रमात सायरस पुनावाला बोलत होते. कोरोना प्रादुर्भाव कालावधीत लॉकडाउन या विषयावर पुण्यातील व्यापारी आणि नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यात गेल्या आठवड्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यसरकारने कोरोना अनलॉक जाहीर केले. लॉकडाउन’चे निर्बंध शिथिल केले. असतांना सायरस पुनावाला यांनीही पुन्हा लॉकडाउन नको अशी भूमिका मांडली आहे.

या कार्यक्रमात बोलतांना पुनावाला म्हणाले की, कोरोना कालावधीत जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत असेल अशा संकटकाळीच लॉकडाउन लावले पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. संकट कालावधीत आम्ही अनेक लसी चहाच्या एका कपाच्या किंमतीत दिल्या आहेत.

‘कोविशील्ड’ आणि ‘कोव्हॅकसिन’ या दोन लसींचा ‘कॉकटेल डोस’ बाबत बोलतांना ते म्हणाले की, मी कॉकटेल डोस विरोधात आहे. मात्र आताच्या लसींचे परिणामकारकता कमी होऊ शेकते. म्हणूनच ‘बुस्टर डोस’ ची गरज पडेल. त्यासाठी मी आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला आहे. कोविशील्ड च्या दोन डोसमध्ये दोन महिन्यांचे म्हणजेच साठ दिवसांचे अंतर असावे. कोरोना झालेल्यांनी सहा महिन्यांनी डोस घ्यावा. महाराष्ट्रात पुण्यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. म्हणून पुण्यासाठी जास्त लस द्यावा असे मी (पुनावाला) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यांनी उत्तरही दिले नाही, असेही ते शेवटी म्हणाले.

– संपादन : रवींद्र कोल्हे 


Related Articles

- Advertisement -

Latest Articles