Saturday, April 20, 2024
Homeराजकारणगॅस सिलिंडर दरवाढ करून मोदी सरकारने जनतेच्या अन्नात आणखी विष कालवले –...

गॅस सिलिंडर दरवाढ करून मोदी सरकारने जनतेच्या अन्नात आणखी विष कालवले – डॉ. उदय नारकर

मुंबई : मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज ५० रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेच्या अन्नात आणखी विष कालवले आहे. सर्व अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांच्या किंमती सतत वाढत असताना ही वाढ लादून केंद्रातील भाजप सरकार जनतेचे कंबरडे मोडत आहे, अशी टिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केली आहे.

डॉ. नारकर म्हणाले, या दरवाढीमुळे सबसिडीवरील गॅस सर्वसामान्य जनतेला आणखी महाग झाल्याने त्याचा वापर कमी होणार आहे. गेल्या वर्षभरात उज्ज्वला योजनेतील १० टक्के ग्राहकांनी पुन्हा सीलिंडर भरून घेतलेले नाही. १२ टक्के ग्राहकांनी वर्षभरात केवळ १ सीलिंडर भरून घेतले आहे. वर्षभरात सरासरी किमान ७ सीलिंडरची गरज असताना ५७ टक्के कुटुंबांनी ४ हून कमी सीलिंडर घेतलेले आहेत.

व्यापारी सीलिंडरचे दर या वर्षी दुसऱ्यांदा वाढवले असून आज त्यात तब्बल ३५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत व्यापारी सीलिंडरचा १६५० रुपयांचा दर आता २,००० रुपये झाला आहे. त्यामुळे लहान आणि छोटे हॉटेल उद्योजक अडचणीत येणार असून प्रक्रिया केलेले पदार्थही आणखी महाग होणार आहेत.

आधीच जनता बेरोजगारी, दारिद्र्य आणि महागाईत होरपळून निघत आहे. त्यात मोदी सरकारने केलेल्या या वाढीचा पक्षाच्या सर्व शाखांनी जनतेला सोबत घेऊन प्रखर विरोध करावा, असे आवाहन माकपची राज्य कमिटी करत असल्याचेही डॉ. नारकर म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय