खेड : दोंदे येथे रामनवमी उत्सव साजरा झाला. भैरवनाथ महाराजांची पालखी गावातील सर्वानी बैलगाडीतून मांडव डहाळे सनईच्या सुरात वाजत गाजत आणली. त्यानंतर ह.भ.प. बांगर महाराज यांचे राम जन्मानिमित्त किर्तनाने रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी पाळणा दोरी ओढण्याचा व पूजेचा मान देवस्थान चे अध्यक्ष अनिल बारणे व राजश्री बारणे याना मिळाला. जयश्री कोहिणकर यांचे भजन क्लास चे मुलींनी रामजन्म पाळणा सादर केला. तसेच दुपारी भव्य बैलगाडा शर्यतमध्ये 102 बैलगाडा सामील झाले होते.
आरोग्य सल्ला : मधुमेह समजून घेताना – डॉ . किशोर खिल्लारे
घाटाचा राजा चषक दिग्विजय सातकर यांच्या गाड्याला प्रदान करण्यात आला. फायनलमध्ये प्रथम क्रमांक बाळासाहेब कंद यांच्या गाड्याने पटकावला. रात्री छबिन्याला भारुडाचा कार्यक्रम पार पडला तर दुसऱ्या दिवशी भारूड हजेरी झाली.
सायंकाळी कुस्ती आखड्यामध्ये पंचक्रोशीतील अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्यांनी कुस्ती शौकिनांच्या नजरेने पारणे फेडत कुस्त्यांचे आखाड्यात सामील झाले. यात महिला पहिलवान सहभागी होण्याची पहिलीच वेळ आहे, हि ग्रामीण भागातील अभिमानास्पद गोष्ट आहे.
न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २२५ विविध पदांसाठी भरती, मुलाखती द्वारे निवड !
जिल्हा न्यायालय अकोला येथे भरती, दहावी उत्तीर्णांसाठी संधी !
यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. निता आल्हाट यांनी महिला पंच म्हणून तसेच बाळासाहेब बारणे, अमोल सुपेकर, बाळासाहेब सांडभोर यांनी पंच म्हणून काम केले.
रात्री करमणुकीचा तमाशाचा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण यात्रेचे नियोजन सरपंच चंद्रकांत बारणे उपसरपंच दादासाहेब कोहिणकर, यात्रा कमिटी अध्यक्ष निशांत बारणे व सचिव सोमनाथ बारणे सर्व पदाधिकारी देवस्थानचे अध्यक्ष अनिल बारणे, अजय उढाणे, शरद सुकाळे, सोमनाथ बारणे, अंगद सुकाळे, रविंद्र म्हेत्रे, सुनील भालेराव, सचिन दरेकर, निलेश बारणे, हनुमंत कदम, किरण तनपुरे, राजेश बारणे, माचिंद्र सुकाळे, विठ्ठल सुकाळे, प्रवीण कोहिणकर, अतुल चौधरी, स्वप्नील दरवडे, बाबाजी कदम, स्वप्नील बारणे, खंडू सुकाळे, ओंमकार कोहिणकर, निलेश शितोळे, सचिन केदारी, आण्णासाहेब मधवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
हरिश्चंद्र गडावर सापडली जगातील सर्वात दुर्मिळ वनस्पती
दोन दिवस चाललेला उत्सव उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. उत्सवासाठी पुणे, मुंबई व बाहेरगावी असणारे नोकरदार मंडळी व ग्रामस्थांनी कोरोना काळानंतर यात्रेसाठी आवर्जून येऊन ग्रामदैवताचे दर्शन घेतले. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भैरवनाथ महाराज यात्रा शांततेत पार पडली.